घरमुंबईमुंबईत ३० टक्के पाणीकपात?

मुंबईत ३० टक्के पाणीकपात?

Subscribe

ऐन उन्हाळ्यात पाणी प्रश्न उद्भवू नये म्हणून मुंबई महापालिकेने १५ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणी कपात सुरु केली आहे. परंतु, काही भागांमध्ये ही पाणी कपात १० टक्के नसून ३० टक्के सुरु झाली असल्याचा दावा शिवसेना पक्षाच्या काही नगरसेवकांनी केला आहे.

परतीच्या पावसाने दगा दिल्यामुळे मुंबईतील जलस्त्रोतांमध्ये फक्त ८५ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणी प्रश्न उद्भवू नये म्हणून मुंबई महापालिकेने १५ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणी कपात सुरु केली आहे. परंतु, काही भागांमध्ये ही पाणी कपात १० टक्के नसून ३० टक्के सुरु झाली असल्याचा दावा शिवसेना पक्षाच्या काही नगरसेवकांनी केला आहे. बऱ्याच दिवसांपासून पाणी नियमितपणे येत नसल्याने परिसरात वावरणे देखील कठिण झाले असल्याचे शिवसेनेच्या नगरसेविका सुजाता सानप यांनी म्हटले आहे. सानप यांच्यासोबतच राजुल पटेल आणि मंगेश सातमकर या शिवसेनेच्या नगरसेवकांनीही तक्रार केली आहे. त्याचबरोबर ३० टक्के एवढी पाणी कपात आता महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या प्रभागातही होत आहे. या प्रगातात पाणीकपातीची झळ बसताना दिसत आहे. त्यामुळे महाडेश्वर यांनी जलअभियंता अशोक तवाडिया यांना पाणीटंचाईचा जाब विचारला आहे.

हेही वाचा – मुंबईत पाणीकपात लागू केलीत, पण पाणी गळतीचं काय?

- Advertisement -

का होत आहे पाणी कपात?

मुंबईत दररोज ३८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. परंतु, यावर्षी तलावामध्ये कमी जलासाठा आहे. त्यामुळे महापालिकेने १५ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणी कपात सुरु केली होती. त्याचबरोबर दरवर्षी मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी १ ऑक्टोबर रोजी तलावांमध्ये १४ लाख ४७ दसलक्ष लीटर पाण्याचा जलसाठा असणे अपेक्षित आहे. परंतु, यावर्षी १ ऑक्टोबरला तलावांमध्ये फक्त १२ लाख १४ हजार लीटर जलसाठा होता. त्यामुळे महापालिकेने १० टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला. त्याचबरोबर यावर्षी वैतरणा नदीचा पाण्याची पातळी कमी झाली आहे आणि मुंबईला ५० टक्के पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणातही केवळ ४ लाख ९९ हजार दशलक्ष लीटर जलसाठा आहे.


हेही वाचा – मुंबईत छुपी पाणीकपात?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -