‘एमयुटीपी-३ प्रकल्पांना’ गती देण्यासाठी ३,५०० कोटींचे कर्ज

local ferries canceled from churchgate to mumbai central

मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे (एमआरव्हीसी) मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्प (एमयूटीपी) हाती घेण्यात आलेले आहेत.  त्यातील  एमयुटीपी ३ मधील प्रकल्पांना गती  देण्यासाठी  एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट बँकेतर्फे ३ हजार ५०० काेटी (५०० मिलियन डालर ) कर्ज मिळाले आहे. साेमवारी केंद्र सरकार, राज्य सरकार,मुंबई रेल्वे विकास महामंडळ आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट बँकेत कर्ज करार संपन्न झाला.यामुळे एमयुटीपी ३ मधील प्रकल्पांना आता गती मिळणार आहे.

एआयआयबी बँकेने दिले 3500 कोटीचे कर्ज

१० हजार ९४७ कोटी रुपयांच्या  एमयुटीपी-३ प्रकल्पाला  डिसेंबर २०१६ मध्ये रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली. परंंतु एमयुटीपी-३ मधील महत्त्वाच्या कामांना सुरुवात झाली नाही. यातील दोन स्थानकादरम्यान रुळ ओलांडण्याचे प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना करणे आणि ऐरोली ते कळवा उन्नत प्रकल्पातील दिघा स्थानकाच्या कामाला काही प्रमाणात सुरुवात झाली. परंतु ही कामे रखडली. एमयुटीपी-३ प्रकल्पातील महत्वाच्या प्रकल्पांचे काम मार्गी लागावे, त्यांना त्वरीत निधी प्राप्त व्हावा यासाठी राज्य शासन, एमएमआरडीए,सिडकाे आणि एमआरव्हीसीमध्ये ९ जुर्ले राेजी सामंजस्य करार करण्यात आला. त्यानंतर आता एमयुटीपी ३ मधील प्रकल्पांसाठी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट बँकेकडूनही ३,५०० कोटी रुपयांचा निधी कर्जाच्या स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात आल्याचे एमआरव्हीसीचे व्यवस्थापकीय संचालक रवी शंकर खुराना यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव समीर कुमार खरे,राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, एमआरव्हीसीचे व्यवस्थापकीय संचालक रवी शंकर खुराना आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट बँकेचे डायरेक्टर जनरल रजत मिश्रा उपस्थित हाेते.