घरमुंबईमहावितरणचे ५५ लाचखोर कर्मचारी पुन्हा कामावर 

महावितरणचे ५५ लाचखोर कर्मचारी पुन्हा कामावर 

Subscribe
महावितरणच्या सेवेत असताना भ्रष्टाचार केला म्हणून सेवेतून निलंबित करण्यात आलेल्या ५५ अधिकारी आणि कर्मचार्‍यांना महावितरणने पावन करून घेतले आहे. या सगळ्याच कर्मचार्‍यांवर लाच घेतली म्हणून चार्जशीट दाखल झाली. गुन्हे नोंदवले गेले आणि अखेर त्यांचे निलंबनही झाले. हे प्रकरण न्यायप्रक्रियेत असताना या सगळ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याने एकच चर्चा सुरू आहे. भ्रष्टाचार करा काहीही हेात नाही, असा संदेश महावितरणने यातून दिला आहे.  कंंपनीची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. यातून नव्याने तांत्रिक कर्मचार्‍यांचा भरणा करणे वितरण विभागाला शक्य नाही. महावितरणमधल्या तांत्रिक कर्मचारी आणि अधिकार्‍यांचा तुटवडा लक्षात घेऊन निलंबन झालेल्यांना पुन्हा कामावर घेण्याची परिस्थिती कंपनीवर ओढावली असल्याचे सांगण्यात आले.

 

महावितरणने निलंबनानंतर पुन्हा सेवेत घेतलेल्या तांत्रिक-अतांत्रिक कर्मचारी अधिकार्‍यांची यादी

१. भगवान खंबायत, सिनिअर ऑपरेटर
२. जयश्री सरोदे, तंत्रज्ञ
३. राकेश लोंढे, तंत्रज्ञ
४. रघुनाथ वाघ, सहाय्यक अभियंता
५. प्रदिप साठे, वरिष्ठ तंत्रज्ञ
६. मोहन पवार
७. संतोष सोनावणे, वरिष्ठ तंत्रज्ञ
८. व्ही.एम, बनसोड, ज्युनिअर ऑपरेटर
९. जी.एच. रणदिवे, वरिष्ठ तंत्रज्ञ
१०. व्ही.एस. सोनबारसे, वरिष्ठ तंत्रज्ञ
११. एस.ए. सोनार, वरिष्ठ तंत्रज्ञ
१२. आप्पासाहेब भागवत, प्रधान तंत्रज्ञ
१३. डी.एस. भोगेकर, वरिष्ठ तंत्रज्ञ
१४. योगेश काळे, तंत्रज्ञ
१५. नवीनकुमार इर्लावर, तंत्रज्ञ
१६. डी. ए. पवार, तंत्रज्ञ
१७. के.आर, सिंदे, वरिष्ठ तंत्रज्ञ
१८. संतोष जिंतुरकर, वरिष्ठ तंत्रज्ञ
१९. राजेंद्र माळवे, वरिष्ठ तंत्रज्ञ
२०. धनंजय वायनरे, तंत्रज्ञ
२१. दीपक चौधरी, सहाय्यक अभियंता
२२. नितीन फड, कनिष्ठ अभियंता
२३. अभिजित कोहाड, कनिष्ठ अभियंता
२४. हेमंत माथपटी, सहाय्यक अभियंता
२५. शैलेंद्र कांबळे, कनिष्ठ अभियंता
२६. गणेश पाचपोहे, कार्यकारी अभियंता
२७. गिरीश भगत, सहाय्यक अभियंता
२८. प्रभाकर गोसावी
२९. समाधान देशमाने, वरिष्ठ अभियंता
३०. अमरनाथ स्वामी, सहाय्यक अभियंता
३१. संदेश थावरे, कार्यकारी अभियंता
३२. सोमेश्वर गुजराथी, सहाय्यक अभियंता
३३. लदाफ राशीद, सहाय्यक अभियंता
३४. संदीप पाटील, कनिष्ठ अभियंता
३५. पराग शिरढोणकर, सहाय्यक अभियंता
३६. खुशाल डुबे, वरिष्ठ तंत्रज्ञ
३७. विश्वनाथ जाधव, वरिष्ठ तंत्रज्ञ
३८. उमेश राऊत, वरिष्ठ तंत्रज्ञ
३९. सोपान गवांदे, तंत्रज्ञ
४०. मनोहर राजनकर, तंत्रज्ञ
४१. दीपक जाधव, तंत्रज्ञ
४२. मनोहर उबाले, वरिष्ठ तंत्रज्ञ
४३. भागवत गायकवाड, तंत्रज्ञ
४४. आर.आर. राऊत, तंत्रज्ञ
४५. प्रशांत दांगट, सहाय्यक अभियंता
४६. राजेंद्र देसाई, कार्यकारी अभियंता
४७. शेख जी.एम, सहाय्यक अभियंता
४८. जितेंद्र राजपुत, कनिष्ठ अभियंता
४९. धनंजय खैरनार, सहाय्यक अभियंता
५०. गजानन आढाव, कनिष्ठ लिपिक
५१. कांतीलाल गोसावी, वरिष्ठ तंत्रज्ञ
५२. अमोल पाटील, तंत्रज्ञ
५३. अनिश खुटे, तंत्रज्ञ
५४. राजेश लाडकत, कनिष्ठ लिपिक
५५. विकाश रस्तोगी, सहाय्यक अभियंता
निलंबित करण्यात आलेल्या सगळ्या ५५ कर्मचार्‍यांना लाच घेतली म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन वर्षांपूर्वी रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरोधी चार्जशीट दाखल केली. गुन्हे दाखल झाले. प्रकरण न्यायालयात गेले आणि महावितरणने पुन्हा त्यांना कामावर घेण्याचा निर्णय घेत एकार्थी लाचलुचपत प्रतिबंधक विभागालाच आव्हान दिले असल्याचे बोलले जात आहे. शासकीय मॅन्युअलनुसार कर्मचार्‍यांना त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन प्रकरण न्यायालयात गेल्यावर सहा महिन्यानंतर पुन्हा कामावर घेतले जाऊ शकते. निलंबनाच्या काळात त्यांना अर्धे वेतन दिले जाते. न्यायालयाचा निर्णय कर्मचार्‍याच्या विरोधात गेल्यास त्याला नोकरीतून दूर केले जाते. न्यायालयाने कर्मचार्‍याला निर्दोष सोडण्यात आल्यास त्याला सारी भरपाई देऊन नियमानुसार पदबढतीही द्यावी लागते.

  दखलबाजांचीही निलंबन माफी

याआधी वीज निर्मिती कंपनीतील काही कर्मचार्‍यांना दखलबाज गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर नियमाप्रमाणे निलंबनाची कारवाई झाली. यातील काहींवर खून आणि मारामारीसारखे गंभीर आरोप होते. निलंबनाच्या कारवाया झाल्या मात्र नियमाप्रमाणे कर्मचार्‍यांना सेवेत घ्यावे लागले होते.

अकारण मानहानी 

महावितरणच्या जळगाव कंपनीत कार्यकारी अभियंता म्हणून काम करताना २०१६मध्ये माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर जवळपास दोन वर्षे सेवेतून निलंबित रहावे लागले. आता जूनमध्ये सेवेत रूजू होण्याचा आदेश मिळाला. निलंबनाची दोन वर्षे अतिशय आव्हानाची होती. माझ्यावरील आरोपामुळे माझे कुटुंब पुरते खचून गेले. कुटुंबियांना आर्थिक आणि मानसिक त्रास झाला. समाजात आणि नातेवाईकांमध्ये मानहानी झाली. न्यायालयात प्रकरण सुरू आहे. पण आपण चुकलो नाही, यावर माझा विश्वास आहे. कार्यालयीन कामकाजाचा राग म्हणून अशा कारवाया केल्या जातात, तसाच हा प्रकार होता.
गणेश पाचपोहे, कार्यकारी अभियंता, जळगाव

भूतकाळ विसरा

कर्मचारी आणि अधिकार्‍यांनी सकारात्मक दृष्टीकोन बाळगून नव्या उमेदेने व उत्साहाने आपले काम करावे. तसेच भूतकाळातील घटना विसराव्यात याच उद्देशाने महावितरणच्या ५५ कर्मचारी आणि अधिकार्‍यांना पुन्हा कामावर घेण्यात आले आहे, असे सांगण्यात आले. या कर्मचारी, अधिकार्‍यांसाठी
नुकतेच एका प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. आत्मनिर्भरता आणि नितीधैर्य जाणीव अशा प्रबोधनात्मक वर्गाचे आयोजन महावितरणने पहिल्यांदाच केले होते.

नियमाबाहेर जाणार नाही

ज्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली त्यांना नियमानुसार कामावर घेण्याची तरतूद आहे. नियमाला आधीन राहूनच त्यांच्यावर कारवाई होईल. न्यायालयाच्या निर्णयानंतर जो काय निर्णय येईल त्याप्रमाणेच कार्यवाही होईल.
मदन येरावार, ऊर्जा राज्यमंत्री.
Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -