घरमुंबईट्रेन उडविण्याचा धमकीने पोलिसांची तारांबळ

ट्रेन उडविण्याचा धमकीने पोलिसांची तारांबळ

Subscribe

लष्कर-ए-तोयबाने दिली धमकी , रत्नागिरी-रोहा-पनवेलमध्ये कोईम्बतूर-हिसार गाडीची तपासणी , मात्र रेल्वेमध्ये काहीही आढळले नाही

कोईम्बतूर येथून दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास सुटणारी कोईम्बतूर-हिसार ही राजस्थानकडे जाणारी ट्रेन सकाळी १० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी रेल्वे स्थानकात आली होती. त्याचवेळी ही गाडी बॉम्बस्फोट घडवून उडवून देण्याची धमकी चेन्नई कंट्रोलला आली. मात्र ही गाडी रत्नागिरी येथून निघाली होती. ती दुपारी २.५० च्या सुमारास पनवेल येथे येताच पोलिसांनी गाडीची कसून तपासणी केली. मात्र गाडीत काहीच सापडले नाही.

दुपारी २.५० च्या सुमारास कोईम्बतूर-हिसार ही १६ डब्यांची गाडी पनवेल स्थानकात आल्यानंतर याठिकाणी एटीएस पथके, नवी मुंबई एटीएस, नवी मुंबई बीडीडीएस, मुंबई लोहमार्ग एटीएस, मुंबई लोहमार्ग बिडीडीएस, मुंबई लोहमार्ग क्राईम ब्रँच, पनवेल लोहमार्ग रेल्वे पोलीस ठाणे, आरपीएफचे जवान, पनवेल शहर पोलीस ठाणे, खांदेश्वर पोलीस ठाणे, पनवेल तालुका पोलीस ठाणे, लोहमार्ग, आरपीएफ आणि नवी मुंबईची एकूण तीन श्वान पथके याठिकाणी आली. या पथकांनी गाडीची संपूर्ण तपासणी केली असता काहीही हाती न मिळाल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

- Advertisement -

कोईम्बतूरहून हिसार (राजस्थान) येथे जाणारी हि गाडी सकाळी १० वाजता रत्नागिरी स्थानकात आल्यानंतर या गाडीची तपासणी करण्यात आली. त्यानंतर सदर गाडी ही गाडी १२.३० वाजण्याच्या सुमारास रोहा येथे आल्यानंतर याठिकाणीही या गाडीची तपासणी करण्यात आली. तसेच पनवेलमध्येही सदर गाडीची तपासणी केल्यानंतर हाती काहीही मिळाले नाही.

सदर गाडी पनवेल स्थानकात येण्यापूर्वी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पनवेल येथे टर्मिनलमध्ये एक बेवारस बॅग सापडली होती. यावेळी गुप्तचर विभागाला कोईम्बतूर-हिसार या लांब पल्याच्या ट्रेनमध्ये घातपात घडविण्याची माहिती मिळाली होती. आणि ती रेल्वे फलाटावर येण्यापूर्वी बेवारस बॅग आढळल्याने तत्काळ बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले. यावेळी संपुर्ण स्टेशन खाली करून तपास सुरू केला असता सदर बॅगेत पेट्रोकेमिकल सापडले. तसेच त्या बागेत एक शेगडीही होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -