घरमुंबईडायघरमध्ये पाण्यासाठीच्या खोदकामातील 107 जुने पाईप चोरीला!

डायघरमध्ये पाण्यासाठीच्या खोदकामातील 107 जुने पाईप चोरीला!

Subscribe

डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाकळणगाव व पिंपरीगाव येथील नळ पाणीपुरवठाकरिता खोदकाम करून जमिनीवर काढून ठेवलेले 1 लाख 4 हजार किमतीचे 107 जुने पाईप चोरट्याने लांबविले. याप्रकरणी शीळ डायघर पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाकळणगाव व पिंपरीगाव येथील नळ पाणीपुरवठा करीत खोदकाम करून जुने पाईप काढून नवीन पाईप लाईन करण्याच्या कामात पाईप लाईन गाडण्याचे काम सुरू होते. मात्र, पाऊस सुरू असल्याने काम दोन महिन्यांपासून बंद होते. या साईटवर स्टेम कंपनीचे सुपरवाईझर रामेश्वर गायकवाड आणि साईट सुपरवाईझर गोरांग देवेंद्र बराई हे दोघेजण 9 ऑगस्ट रोजी 4 च्या गेले असताना या ठिकाणच्या जमिनीतून उकरून काढलेले चोरट्यांनी 5 बाय 6 मीटरचे 150 एम.एम. व्यासाचे एकूण 52 बीडचे 1 लाख 4 हजार किंमतीचे 107 जुने पाईप चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -