घरताज्या घडामोडीडोंगरी परिसरात सात मजली इमारतीचा भाग कोसळला

डोंगरी परिसरात सात मजली इमारतीचा भाग कोसळला

Subscribe

मुंबईतील डोंगरी परिसरातील एका ७ मजली इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार; इमारतीच्या ३ ते ७ व्या मजल्याच्या मागील संपूर्ण भाग कोसळला असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून इमारती कोसळण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी नागपाड्यातील एका इमारतीचा भाग कोसळल्याची दुर्घटना घडली होती. तर नालासोपारा पूर्वेकडील संकेश्वर नगर इथे रात्री दीडच्या सुमारास साफल्य इमारत कोसळल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा मुंबईतील डोंगरी परिसरातील एका ७ मजली इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार; इमारतीच्या ३ ते ७ व्या मजल्याच्या मागील संपूर्ण भाग कोसळला असल्याचे सांगण्यात येत आहे.

https://twitter.com/ANI/status/1301040365009428480

- Advertisement -

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच; तातडीने पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. यानुसार बचाव कार्य सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. या भीषण अपघातामध्ये इमारतीच्या जिन्याजवळ एक महिला अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

ही इमारत नेमकी कशी कोसळली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. तसेच या कोसळलेल्या ढिगाऱ्यात आणखी कोणी अडकले आहे का याची अद्याप माहिती मिळालेली नाही. तसेच सध्या बचाव कार्य सुरु असून नागरिकांना बाहेर काढण्याचे काम देखील सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – नालासोपाऱ्यात चार मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -