घरमुंबई'त्याच्या' फुफ्फुसात अडकलेले घड्याळाचे सेल काढण्यात यश

‘त्याच्या’ फुफ्फुसात अडकलेले घड्याळाचे सेल काढण्यात यश

Subscribe

एका ११ वर्षीय मुलाच्या फुफ्फुसात अडकलेले डिजीटल घड्याळाचे सेल काढण्यात हॉस्पीटलला यश आले आहे.

लहान मुलं खेळत असताना त्याच्यावर पालकांनी विशेष लक्ष देणं गरजेचं असतं हे माहीत असूनही अनेकदा लहान मुलं आपल्या हातात मिळतील त्या गोष्टी तोंडात घालतात. कधी आई-वडिलांचं दुर्लक्ष मुलांच्या जीवावर बेततं. असाच एक प्रकार नुकताच मुंबईत घडला. एका ११ वर्षाच्या मुलाने खेळत असताना डिजीटल घडाळाचे सेल गिळले. ते सेल या मुलाच्या फुप्फुसात जाऊन अडकले होते. या मुलाला काही वेळाने त्रास जाणवायला सुरूवात झाल्यानंतर आई-वडिलांना डॉक्टरांकडे धाव घेतली. त्याला तात्काळ जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी मुलाच्या फुफ्फुसातून डिजिटल घड्याळाचा सेल काढला. एका दिवसात डॉक्टर्सने त्याच्यावर उपचार करत त्याला घरी सोडले.

सेलमधील अॅसिड फुफ्फुसात पसरण्याची भिती

कोरड्या सेलला गिळलेल्या या मुलाला रविवारी रात्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्याला खोकला आणि श्वासोच्छ्वास करण्यास त्रास होत होता. श्वसन औषधांचे सल्लागार डॉ. हरीश चाफले आणि इतर डॉक्टरांना एक्स-रे मार्फत सेल फुफ्फुसामध्ये असल्याचं कळलं. त्यानंतर डॉक्टरांनी फुफ्फुसांना दूर करण्यासाठी फोर्सेप वापरुन व्हिडिओ ब्रोन्कोस्कोपी करण्याचे ठरवले. याविषयी अधिक माहिती देताना डॉक्टरांनी सांगितले की, “सेल मधील अॅसिड बाहेर येत होते आणि त्या भागामध्ये पसरत होते. सेलची बॅटरी अत्यंत धोकादायक असते. त्यामुळे त्यामधील विषारी पदार्थांमुळे अन्ननलिकेमध्ये जळजळ होऊ शकते आणि योग्य औषधोपचार न केल्यास ते घातक ठरु शकते.”

हा मुलगा केवळ ११ वर्षांचा असल्यामुळे हे एक आव्हान होते. तो श्वास घेत असताना देखील ब्रोन्कोस्कोपी स्वयंचलितपणे ऑपरेट करायची होती. मुलाला श्वास घेण्यास मदत करण्यासाठी ‘एंडोट्राचेल ट्यूब’ नावाच्या लवचिक प्लास्टिकच्या नळीला तोंडामध्ये बाजूला ठेवण्यात आले होते. सेल एंडोट्राचेल ट्यूबमधून बाहेर आला नसता कारण दूरच्या वातनलिकांमध्ये आणखी विचलित होण्याचा धोका पत्करण्याशिवाय त्याला पकडणे कठीण होते. जेथे ब्रोन्कोस्कोप पोहचणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत, शस्त्रक्रिया करून काढून टाकणे हाच एकमात्र पर्याय होता. ज्यामुळे त्याचे फुफ्फुस शस्त्रक्रियेद्वारे उघडण्यात आले आणि सेल बाहेर काढण्यात आला.
डॉ. हरीश चाफले, श्वसन औषधांचे सल्लागार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -