घरमुंबईमरीन लाईन्सकडील पाण्याची टाकी झाली साफ

मरीन लाईन्सकडील पाण्याची टाकी झाली साफ

Subscribe

पाण्याच्या टाक्यांवर रेल्वेचा असणार वॉच

‘मरीन लाईन्स रेल्वे स्थानकावरील पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर घाणीचे साम्राज्य’ या मथळ्याखाली दैनिक ‘आपलं महानगर’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर कुंभकर्णीय झोपेत असलेले रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले असून, तत्काळ त्या ठिकाणाकडील रेल्वेच्या पिण्याच्या पाण्याची टाकी रेल्वे प्रशासनाने साफ केली. तसेच पाणाच्या टाकीवरील तो खड्डाही बुजवण्यात आला असून, यासंबंधी चौकशीचे आदेश पश्चिम रेल्वेकडून देण्यात आले आहेत.

मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ४ च्या दक्षिणेच्या दिशेनेे १०० मीटर अंतरावर रेल्वेची पाण्याची टाकी आणि पंप रूम आहे. या टाकीचे पाणी मरीन लाईन्स रेल्वे सथानकावरील उपहार गृह, रेल्वे कर्मचारी यांचे कार्यालय आणि स्थानकांवरील पाणपोई यांना जाते. त्यामुळे या पिण्याच्या पाण्याच्या टाकीची सुरक्षा आणि स्वच्छता यांची जबाबदारी हा महत्त्वाचा भाग आहे, परंतु या जबाबदारीकडे रेल्वेकडून दुर्लक्ष केले जात होते. या पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर घाणीचे साम्राज्य जमले असून, गर्दुल्ले याच टाकीतून पाणी काढून त्याचा वापर करत असल्याचे वृत्त दैनिक ‘आपलं महानगर’ने प्रकशित केले होते. त्यानंतर पश्चिम रेल्वेने तत्काळ या पिण्याच्या पाण्याच्या टाकीची स्वच्छता करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत.

- Advertisement -

सोबतच पाण्याच्या टाकीवरच्या स्लॅबवर खड्डा असल्याने या टाकीतील पाणी प्रदूषित होण्याची शक्यता होती. त्यामुळे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून हा खड्डा सुद्धा बुजवण्यात आला आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली आहे. मरीन लाईन्स स्थानकांवरील काम करणारे रेल्वे कर्मचारी यांनी यासंबंधी मागील २ महिन्यांपूर्वी या विषयी तक्रार पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे केली होती, परंतु अद्याप त्यावर कारवाई झाली नव्हती. मात्र, दैनिक ‘आपलं महानगर’ने या संबंधी वृत्त दिल्यानंतर पश्चिम रेल्वेने आपल्या रेल्वेच्या पिण्याच्या टाक्याची पाहणी सुरू केली आहे. सोबतच मरीन लाईन्स स्थानकावरील या प्रकारांची सखोल चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या एक अधिकार्‍याने दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -