घरमुंबईआमिर खान पॉझिटिव्ह! मुख्यमंत्र्यांनाही करावी लागणार कोरोना चाचणी!

आमिर खान पॉझिटिव्ह! मुख्यमंत्र्यांनाही करावी लागणार कोरोना चाचणी!

Subscribe

जागतिक जल दिनाचे औचित्य साधून २२ मार्च रोजी पाणी फाऊंडेशनचा ‘सत्यमेव जयते समृद्ध गाव’ स्पर्धेचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली होती. यावेळी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून पर्यावरण आणि आर्थिक समृद्धीच्या वाटेवर असलेल्या गावांचे आणि त्या गावातील गावकऱ्यांचे कौतुक देखील मुख्यमंत्र्यांनी केले. दरम्यान पाणी फाऊंडेशनच्या या कार्यक्रमास मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला बॉलिवूडचा अभिनेता आमिर खान देखील उपस्थितीत होता आणि त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती बुधवारी समोर आली. दोन दिवसांपूर्वी आमिर खानची पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना देखील कोरोनाची चाचणी करावी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

दरम्यान, पाणी फाऊंडेशनच्या ‘सत्यमेव जयते समृद्ध गाव’ स्पर्धेचा गौरव सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी येथे पार पडला होता. या सोहळ्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह बॉलिवूड अभिनेता आमिर खान, राज्याचे कृषीमंभी दादा भुसे, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, आमिर खानची पत्नी किरण राव, मुख्य सचिव सीताराम कुंट, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ आणि प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ हे देखील उपस्थितीत होते. त्यामुळे अलीकडच्या काळात संपर्कात आलेल्या सर्वांनी खबरदारीचा उपाय म्हणून चाचणी करावी, असे आवाहन आमिर खानने केले आहे.

बुधवारी आमिर खानला कोरोनाची लागण झाली असून तो होम क्वारंटाईन आहे. सध्या त्याची प्रकृती बरी आहे. यासह आमिर खान यांनी त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना खबरदारी म्हणून कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन देखील केले आहे.

- Advertisement -

मातोश्रीत कोरोनाची एन्ट्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं निवास्थानात कोरोनाची एन्ट्री झाल्याचे समोर आले आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पत्नी रश्मी ठाकरे यांनीदेखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सध्या दोघेही कोरोनावरील उपचार घेत आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -