घरमुंबईवसईत अपहरण केलेला कुत्रा सापडला

वसईत अपहरण केलेला कुत्रा सापडला

Subscribe

वसईच्या पेट्रोलपंपावरून अपहरण केलेला कुत्रा चोरट्यांनी पुन्हा त्याच जागी आणून सोडला असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

वसईच्या पेट्रोलपंपावरून अपहरण केलेला कुत्रा चोरट्यांनी पुन्हा त्याच जागी आणून सोडला आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल आणि कारचा ठावठिकाणा शोधून काढला असून लवकरच चोरट्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती देखील दिली आहे.

नेमके काय घडले?

वसई पूर्वेकडील गोखीवरे येथील रवी धोत्रे तीन ते चार दिवसांसाठी आपल्या परिवारासह गावाला गेले होते. यासाठी त्यांनी आपल्या हॅपी नावाच्या कुत्र्याला त्यांच्या फादरवाडी येथील पेट्रोल पंपावर कर्मचार्‍यांच्या देखरेखीखाली ठेवला होता. शनिवारी सकाळी जेव्हा धोत्रे परिवार गावावरून परत आले असता त्यांना कुत्रा चोरीला गेल्याचे समजले. हचेशन एस्सेर जातीचा हॅपी नावाचा कुत्रा शुक्रवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान, पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला आलेल्या दुचाकीवरील दोन इसमानी या कुत्र्याला पळवून नेताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. त्यानंतर याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

- Advertisement -

अशी उघडकीस आली घटना

या घटनेचा गोंगाट झाल्यानंतर रविवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास लाल रंगाची होंडा सिटी ही चारचाकी पेट्रोलपंपावर आली. त्या गाडीतून हॅपीला बाहेर फेकून देत असतानाचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. यावेळी कर्मचार्‍यांनी गाडीचा पाठलाग केला असता गाडी वेगात असल्याने निघून गेली. त्यामुळे आरोपी हाती लागले नाहीत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून दुचाकी आणि कारचा नंबर टिपून आरटीओच्या मदतीने मालकाचा पत्ता मिळवला आहे. त्यामुळे चोरटे लवकरच हाती लागतील, असे पोलिसांनी सांगितले. तर या प्रकारानंतर रवी धोत्रे यांनी त्यांच्या कुत्र्याच्या पट्ट्याला जीपीआरएस सिस्टिम लावली आहे. त्यामुळे आता ज्या ठिकाणी कुत्रा जाईल त्या ठिकाणचा पत्ता यामार्फत त्यांना मिळणार आहे.


हेही वाचा – वसईत एका वर्षाच्या कुत्र्याचे अपहरण

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -