घरट्रेंडिंग'मोदींना मत हेच आम्हाला गिफ्ट', मोदी भक्ताची लग्नपत्रिका

‘मोदींना मत हेच आम्हाला गिफ्ट’, मोदी भक्ताची लग्नपत्रिका

Subscribe

या युवकाने त्याच्या लग्नपत्रिकेच्या तळाला 'वोट फॉर मोदी इन 2019' असा संदेश देत लोकांनी नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा संधी द्यावी अशी विनंती केली आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. आजच्या इंटरनेटच्या युगात जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, बहुतांशी पक्षांनी सोशल मीडियाचाही मोठ्या प्रमाणात वापर सुरु केला आहे. एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे प्रत्येक राजकीय पक्षाला फॉलोअर्सही आपआपल्या पद्धतीने त्यांचा प्रचार करत आहेत. अशाच एका ‘मोदी भक्ताने’ केलेला आगळावेगळा प्रचार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका अवलियाने आपल्याच लग्नपत्रिकेमधून भाजपचा असा काही प्रचार, प्रसार केलाय की त्याची चर्चा तर होणारच. हा मोदी समर्थक एक तरुण उद्योजक असून, त्याने आपल्या लग्न पत्रिकेवर ‘राफेल घोटाळा झाला नाही आणि मोदींवर केले जाणारे आरोप धादांत खोटे आहेत’… असं छापलं आहे. इतकंच नाही त्याने पत्रिकेच्या माध्यमातून ‘मोदींना पुन्हा मत द्या’ अशी मागणी देखील केली आहे.

- Advertisement -

मध्यंतरी एका मुलीने मुलगा मोदी समर्थक आहे या कारणावरुन लग्न मोडलं होतं. त्यापाठोपाठ आता हा दुसरी रंजक घटना समोर आली आहे. या अवली तरूणाचं नाव युवराज पोखरण असं असून, तो सुरतमध्ये राहणारा एक युवा उद्योजक आहे. युवराज आणि त्याची भावी पत्नी साक्षी यांनी त्यांच्या लग्नपत्रिकेतून त्यांचे लाडके नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांती भूमिका मांडणारं एक छोटसं पत्रक दिलं आहे. ‘मोदी हे राफेल प्रकरणामध्ये पूर्णत: निर्दोष असून, त्यांच्यावर लावलेले आरोप बिनबुडाचे आहेत. नेमक्या याच मुद्द्याचा प्रसार करण्यासाठी मी ही अनोखी लग्नपत्रिका छापली आहे’, असं स्पष्टीकरण युवराजने दिलं आहे. याशिवाय पत्रिकेच्या तळाला ‘वोट फॉर मोदी इन 2019’ असा संदेश देत लोकांनी नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा संधी द्यावी अशी विनंती केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -