घरदेश-विदेशमुंबईमधील बांगलादेशी-रोहिंग्यांवर लवकरच कारवाई; विशेष समितीही स्थापन - मंगलप्रभात लोढा

मुंबईमधील बांगलादेशी-रोहिंग्यांवर लवकरच कारवाई; विशेष समितीही स्थापन – मंगलप्रभात लोढा

Subscribe

मुंबई उपनगरचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या संदर्भांत प्रशासकीय अधिकारी आणि पोलिसांची बैठक बोलावली होती. या बैठकीत पी नॉर्थ वॉर्डमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्ये राहत असल्याची तक्रार करण्यात आली होती.

मुंबईमध्ये (mumbai) बांगलादेशी आणि रोहिंग्ये बेकायदेशीररित्या मोठया प्रमाणावर राहत आहेत असा आरोप वारंवार केला जात आहे. दरम्यान या सर्व घडामोडींवर राज्यसरकारने तातडीने पाऊल पाहिजे. मालाड मालवणी परिसरात बांगलादेशी आणि रोहिंग्ये अवैधरित्या राहतात. घुसखोरी करून राहणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्ये यांची माहिती मिळविण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचे आदेश मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा (managalprabhat lodha) यांनी दिले आहेत. दरम्यान ही समिती 90 दिवसांमध्ये आपला अहवाल सादर करेल असेही मंगलप्रभात लोढा म्हणाले.

मुंबई मधील मालाड-मालवणी (malad – malavani) या भागात अनेक रोहिंग्ये राहत असल्याची माहिती मिळाली होती, त्यामुळे आता या परिसरात त्यांचा शोध घेऊन अहवाल दिला जाणार आहे. मुंबईतील भूमिपुत्रांचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी हे पाऊल महत्वाचे ठरणार आहे, असंही मंगलप्रभात लोढा म्हणाले.

- Advertisement -

मुंबई उपनगरचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या संदर्भांत प्रशासकीय अधिकारी आणि पोलिसांची बैठक बोलावली होती. या बैठकीत पी नॉर्थ वॉर्डमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्ये राहत असल्याची तक्रार करण्यात आली होती. यानंतर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले. त्याचसोबत या समितीला 90 दिवसांमध्ये अहवाल सादर करण्यासही सांगितले. हा अहवाल आल्यानंतर जर परिसरात अवैधरित्या बांगलादेशी आणि रोहिंग्ये राहत असतील, तर त्यांच्यावर काय कारवाई केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हे ही वाचा –  पंकजा मुंडेंनी समजावलं चहा आणि राजकारणातलं साम्य

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -