घरमुंबईमॉर्निंग वॉकर्ससाठी घामाघुम योगा!

मॉर्निंग वॉकर्ससाठी घामाघुम योगा!

Subscribe

संचारबंदी असतानाही मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या 34 जणांना ताब्यात घेऊन काशिमीरा पोलिसांनी उड्डाणपुलाखाली घाम फुटेपर्यंत योगा करायला लावून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. मीरा भाईंदर परिसरात करोनाचे पन्नासहून अधिक रुग्ण आहेत. त्यामुळे पोलिसांनी घराबाहेर पडणार्‍यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. असे असतानाही शिवाजी पुतळा, हटकेश चौक, सिल्वर पार्क परिसरात मॉर्निंग वॉकसाठी मोठ्या प्रमाणावर लोक घराबाहेर पडत आहेत. शनिवारी सकाळी बाहेर फिरणार्‍या 34 लोकांना ताब्यात घेण्यात आले.

यासर्वाना उड्डाणपुलाखाली बसवून त्यांच्याकडून घाम फुटेपर्यंत योगा करायला लावला. त्यानंतर 34 जणांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 188 ,269, 270, 271 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ब, सह महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना कायदा 2020 चे नियम 11 नुसार कारवाई करण्यात आली. दरम्यान, कोणीही घराबाहेर पडू नये, अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दहा ते बारा दिवसांनी किंवा पंधरा दिवसाला फक्त एकदा व एका कुटुंबातील एकाच व्यक्तीने घराबाहेर पडावे, सर्व ठिकाणी मास्क वापरावा व सोशल डिस्टन्सींग ठेवावे, असे आवाहन काशीमिरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी केले आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -