घरमुंबईमुंबईत पाण्याचा पुनर्वापर करणारी १०० शौचालये; आदित्य ठाकरेंचा मानस

मुंबईत पाण्याचा पुनर्वापर करणारी १०० शौचालये; आदित्य ठाकरेंचा मानस

Subscribe

घाटकोपर (प.) येथे उभारण्यात आलेल्या ‘वाॅटर रिसायकलींग कम्युनिटी टाॅयलेट’प्रमाणे संपूर्ण मुंबईत १०० टॉयलेट बांधण्याचा मानस राज्याचे पर्यटन, पर्यावरण व पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. घाटकोपर ( प.), जगदूशा नगर येथे शिवसेना नगरसेवक डॉ. अर्चना भालेराव व माजी नगरसेवक संजय भालेराव यांच्या प्रयत्नाने, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचएसबीसी बँक, मुंबई महापालिका यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या ‘वाॅटर रिसायकलींग कम्युनिटी टाॅयलेट’चे लोकार्पण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी वरीलप्रमाणे मानस व्यक्त केला.
पिण्याचे शुद्ध पाणी, शौचालयात वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर, महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन, दिव्यांगसाठी वेगळे शौचालय, कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशिन्स, अंघोळीसाठी शॉवर, शुद्ध पिण्याचे पाणी असे टॉयलेट मॉल, पंचतारांकित टॉयलेट्स मुंबईत सर्वत्र असावेत. त्यामुळे लोकांची आवश्यक गरज भागविता येणार आहे, असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

मुंबईतील नागरिकांचे राहणीमान उंचावण्याच्या उद्देशाने मुंबई महापालिका, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि एचएसबीसी इंडिया यांच्या संयुक्त भागीदारीतून मुंबईतील ६ वे सुविधा केंद्र अजपासून कार्यान्वित करण्यात आले आहे.घाटकोपर येथील या ‘वाॅटर रिसायकलींग कम्युनिटी टाॅयलेट’मध्ये वापरलेल्या पाण्यावर पुनर्प्रक्रिया करुन दरवर्षी १० दशलक्ष लीटर पाण्याची होणार बचत करण्यात येणार आहे. शौचालयातील पाण्यावर पुनर्प्रक्रिया करुन पुन्हा शौचालयातच वापरासाठी पुरविण्याचे तंत्र असणारे मुंबईतील पहिलेच सुविधा केंद्र आहे.

- Advertisement -

याप्रसंगी, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, उप महापौर सुहास वाडकर, पालिका सभागृह नेत्या विशाखा राऊत, नगरसेविका स्नेहल मोरे, नगरसेवक तुकाराम पाटील, परिमंडळ उपआयुक्त देवीदास क्षीरसागर, सहायक आयुक्त संजय सोनावणे, पालिका जनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

आतापर्यंत ३५ दशलक्ष लीटर पाण्याची बचत

यापूर्वी ५ केंद्रांमध्ये स्नानगृह, हात धुणे, यांत्रिकी पद्धतीने कपडे धुणे इत्यादी सोयींमधून निघणाऱया सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करुन पुनर्वापरावर भर देण्यात आला. या सर्व ५ सुविधा केंद्रांच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल ३५ दशलक्ष लीटर पाण्याची बचत करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रामध्ये वार्षिक सुमारे २० हजार याप्रमाणे ५ केंद्रांमध्ये मिळून सुमारे १ लाख नागरिक सदर सुविधांचा लाभ घेतात.

- Advertisement -

मुंबईमध्ये ६ सुविधा समुदाय केंद्र उभारण्याचा संयुक्त प्रकल्प मुंबई महापालिकेसह हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनी आणि एचएसबीसी इंडिया यांच्या संयुक्त प्रयत्नाने हाती घेण्यात आला आहे. घाटकोपर (पश्चिम) मधील आझाद नगरामध्ये सर्वप्रथम १९ नोव्हेंबर २०१६ रोजी पहिल्या सुविधा केंद्राचे लोकार्पण झाले. त्यानंतर मालाड-मालवणी येथे २९ जुलै २०१९, अंधेरीमध्ये १९ नोव्हेंबर २०१९, गोवंडीत १५ ऑगस्ट २०२० तर कुर्ला येथे २६ जानेवारी २०२१ रोजी या क्रमाने मुंबईतील सुविधा केंद्र कार्यान्वित झाली आहेत. आता धारावीमध्ये अतिरिक्त केंद्र बांधले जात आहे.धारावीत १११ शौचकूप असलेले सुविधा केंद्र उभारणी सुरु आहे, असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.


कोरोना नियमाचं पालन करून राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून होणार सुरू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -