घरमुंबईपुन्हा भेसळयुक्त दूध, मिठाईवर एफडीएची कारवाई

पुन्हा भेसळयुक्त दूध, मिठाईवर एफडीएची कारवाई

Subscribe

सध्या मुंबईसह लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पदार्थांचा वापर केला जात असल्याचं समोर आलं आहे. अनेकदा मिठाईमध्ये तसेच दूधात भेसळ होत असून त्याची खुलेआम विक्री होते. त्यातून लोकांच्या आरोग्यांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

मुंबईच्या उपनगरातील भाईंदर परिसरातून मुदत संपलेल्या ७८० दुधाचे कॅन्स जप्त केले आहेत. राज बिझमन कंपनी हे कॅन्स कमी किंमतीत मिरारोड परिसरात विकत होते. या कमी किंमतीच्या आणि मुदत संपलेल्या दुधाच्या कॅन्स खुलेआम मिरारोड परिसरात विकले जात होते. रविवारी मिरारोड स्थानकानजीक रेडी टू ड्रींक पॅक दूध हे १० रुपयाने विकले जात होते. तिथल्या स्थानकांनी असे काही पॅक खरेदी केले. त्यावर असलेला स्टॅम्प आणि मुळ किंमत खोडून टाकण्यात आली होती. शिवाय, त्यांची मुदत ही संपली होती. असे ७८० कॅन्स हस्तगस्त करण्यात आले आहेत. तर, याविषयी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, जप्त केलेले कॅन्स तपासण्यांसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. आतापर्यंत कुणावरही कारवाई झालेलं नाही असं ही स्पष्ट करण्यात आलं आहे.

२५० किलो भेसळयुक्त मिठाई जप्त 

पालघर जिल्ह्यातील वसई परिसरात खराब मिठाईचा पुनर्वापर करून मिठाई बनवली जात होती. तब्बल २५० किलो भेसळयुक्त मिठाई जप्त करण्यात आली आहे. खराब मिठाईचा पुनर्वापर करून विकली जात असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकला असता ११० किलो भेसळयुक्त मिठाई आणि १४० किलो मशीनमध्ये टाकली जाणारी खराब मिठाई जप्त करण्यात आली आहे. पालघर पोलिसांनी याबाबत ठाणे अन्न आणि औषध प्रशासनाला कळवल्यानंतर त्या परिसरात धाड टाकण्यात आली.

- Advertisement -

पोलिसांनी मिळाली माहिती 

याविषयी ठाणे एफडीएचे सह-आयुक्त शिवाजी देसाई यांनी सांगितलं की, “वसई परिसरातील हॉटेल, रिसॉर्ट आणि रेस्टॉरंटमध्ये भेसळयुक्त मिठाई विकली जाणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी याबाबत एफडीएला कळवलं. त्यानुसार सोमवारी दुपारी बापाणे येथील वाकीपाड्यातील कृष्णा मंगल डेअरी आणि स्विट मार्टवर छापा टाकत २५० किलो भेसळयुक्त मिठाई जप्त केली आहे. यात मिल्क केक, पेढे, बर्फी आणि लाडूचा समावेश आहे. मिठाईचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवाल मिळाल्यानंतर संबंधित दोषींवर कारवाई केली जाईल. या तपासणीत अन्न सुरक्षेच्या कुठल्याही नियमांचे पालन न करता गलिच्छ वातावरणात मिठाईचा साठा आणि मिठाई बनवली जात असल्याचं दिसून आलं.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -