घरमुंबईलॉकडाऊनमध्ये ऑनलाईन वीजबिल भरण्यात ४०० टक्के वाढ

लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन वीजबिल भरण्यात ४०० टक्के वाढ

Subscribe

मुंबई उपनगरातील वीज ग्राहकांचा ऑनलाईनकडे कल

लॉकडाऊनच्या काळामध्ये अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (एईएमएल)च्या ग्राहकांना प्रत्यक्ष कन्झ्युमर केअर सेंटर्समध्ये जाणे शक्य झाले नाही. त्यामुळे या लॉकडाऊनच्या कालावधीत चौकशी आणि तक्रारनिवारणासाठी हे ग्राहक डिजिटल पद्धतींकडे वळल्याचे दिसून आले. एईएमएलच्या सुमारे ५.५ लाख ग्राहकांनी एईएमएलच्या चॅटबॉट, वेबसाइट, ट्विटर व इतर सोशल मीडिया हँडल्ससारख्या विविध डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर करून कंपनीशी संपर्क साधला. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांमुळे तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये झालेल्या परिवर्तनामुळे विविध डिजिटल चॅनेल्द्वारे वीजबिल भरणा केला आहे.एईएमएलच्या ५.५ लाख ग्राहकांपैकी एकूण ३.७ लाख ग्राहकांनी यावर्षी एईएमएल वेबसाइद्वारे संपर्क साधला. गेल्या वर्षी ही संख्या ८० हजार इतकी आहे.

यावर्षी २८,१९६ ग्राहकांनी ट्विटरद्वारे कंपनीशी संपर्क साधला तर १९३३ जणांनी फेसबुकद्वारे एईएमएलच्या सेवा प्राप्त केल्या. २०१८ मध्‍ये केवळ १८ ग्राहकांनी फेसबुकच्या माध्यमातून कंपनीशी संपर्क साधला होता, तर ७९८३ ग्राहकांनी ट्विटरचा वापर केला होता. या ५.५ लाख ग्राहकांव्यतिरिक्त आणखी १.१ लाख ग्राहकांनी कंपनीने अलिकडेच आपल्या ग्राहकांसाठी सुरू केलेल्या व्हॉट्सअॅप सेवेचा वापर केला. दीड लाख ग्राहकांनी कंपनीच्या चॅटबॉट इलेक्ट्रा सेवेचा वापर केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा १० पट मोठा आहे. २०१९ मध्ये केवळ ९२१५ ग्राहकांनी चॅटबॉट सेवेचा वापर केला.

- Advertisement -

डिजिटल सेवेच्या वापरामध्ये ४०० टक्‍के वाढ झाल्याने अदानी इलेक्ट्रिसिटीला आढळून आले. २०१९ मध्‍ये कंपनीच्या या ५.५ लाख ग्राहकांपैकी केवळ १ लाख ग्राहकांनी डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर केला होता. हे प्रमाण यावर्षी अनेक पटींनी
वाढले.

लॉकडाऊनच्या काळामध्ये ग्राहकांची सोय व्हावी यादृष्टीने आवश्यक त्या सर्व महत्त्वाच्या उपाययोजना करणे आमच्यासाठी अगत्याचे होते. हे उपाय अंमलात आणण्यासाठी आम्ही आमच्या ग्राहकांसाठी अनेक डिजिटल पर्याय उपलब्ध करून दिले व आतापर्यंत आमच्या या डिजिटल प्लॅटफॉर्म्सना आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. ग्राहकांना अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी सर्व आघाड्यांवर आमच्या सेवा विस्तारण्याचे काम आम्ही यापुढेही सुरू ठेवू असे एईएमएलच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -