घरमुंबईआयडॉलच्या तीन विद्यार्थ्यांनी परदेशातून दिली परीक्षा

आयडॉलच्या तीन विद्यार्थ्यांनी परदेशातून दिली परीक्षा

Subscribe

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेतर्फे (आयडॉल) घेण्यात आलेली ही ऑनलाईन परीक्षा तीन विद्यार्थ्यांनी थेट परदेशातून दिली आहे. अमेरिका, फ्रान्स व जर्मनीतून या विद्यार्थ्यांनी तृतीय वर्ष बीएची परीक्षा दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशानुसार मुंबई विद्यापीठाने यंदा अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाईन घेतली. मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेतर्फे (आयडॉल) घेण्यात आलेली ही ऑनलाईन परीक्षा तीन विद्यार्थ्यांनी थेट परदेशातून दिली आहे. अमेरिका, फ्रान्स व जर्मनीतून या विद्यार्थ्यांनी तृतीय वर्ष बीएची परीक्षा दिली.

आयडॉलच्या २०२० च्या तृतीय वर्ष बीए व बीकॉमची परीक्षा २६ ऑक्टोबरपासून सुरु झाली. तृतीय वर्ष बीएची परीक्षा ४ नोव्हेंबरला संपली. आयडॉलचे विद्यार्थी घरी राहून परीक्षा देत आहेत. यातील काही विद्यार्थी नोकरीसाठी तर काही विद्यार्थी कोविडमुळे परदेशात अडकले आहेत. त्यांनी परदेशात राहून अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने दिली आहे.

- Advertisement -

अपर्णा काकिर्डे ही विद्यार्थिनी अमेरिकेत असून तिने आयडॉलमधून अर्थशास्त्र विषयात बीएची अंतिम वर्षाची परीक्षा अमेरिकेतून ऑनलाईन दिली. ऑनलाईन परीक्षेमुळे मी परीक्षेसाठी भारतात न येता मी अमेरिकेत राहून ही परीक्षा दिली. परीक्षा देताना कोणताही अडथळा आला नाही. काही प्रश्न हे अवघड होते, परंतु सर्वसाधारण प्रश्नपत्रिका चांगली होती. ज्यांनी अभ्यास केला नाही त्यांना हा पेपर अवघड होता. कोविडनंतरही अशीच ऑनलाईन परीक्षा सुरु राहावी ही अपेक्षा. अमेरिकेतून परीक्षा दिलेल्या अपर्णा काकिर्डे या विद्यार्थीनीने आयडॉलच्या प्राध्यापकास हा मेसेज पाठविला आहे.

ओम्रिता सुभाष नंदी या विद्यार्थिनीने फ्रान्समधून इंग्रजी विषयात बीएची अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाईन दिली. तसेच सुरेंद्र सोळंखी हा विद्यार्थी जर्मनीमध्ये नोकरी करीत आहे. त्याने अर्थशास्त्र याविषयात बीएची अंतिम वर्षाची परीक्षा जर्मनीतून ऑनलाईन दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -