घरCORONA UPDATEनगरसेवक निधीतून २५ लाख रुपये वापरण्यास भाजप पाठोपाठ काँग्रेसची मागणी

नगरसेवक निधीतून २५ लाख रुपये वापरण्यास भाजप पाठोपाठ काँग्रेसची मागणी

Subscribe

कोरोना कोवीड १९ च्या प्रतिबंधात्मक कार्यवाहीसाठी आमदारांना आपला निधी वापरण्यास मंजुरी दिल्यानंतर, त्याच धर्तीवर मुंबईतील नगरसेवकांना आपल्या निधीतून २५ लाखांचा निधी वापरण्याची मागणी आता भाजप पाठोपाठ काँग्रेसनेही केली आहे.

कोरोना कोवीड १९ च्या प्रतिबंधात्मक कार्यवाहीसाठी आमदारांना आपला निधी वापरण्यास मंजुरी दिल्यानंतर, त्याच धर्तीवर मुंबईतील नगरसेवकांना आपल्या निधीतून २५ लाखांचा निधी वापरण्याची मागणी आता भाजप पाठोपाठ काँग्रेसनेही केली आहे. काँग्रेसच्या माझगाव येथील नगरसेविका सोनम जामसुतकर यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देत नगरसेवक निधीतून कोरोनासंदर्भात विविध उपाययोजना राबवण्यासाठी २५ लाख रुपयांपर्यंतचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी अधिनियमांमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे.

घरोघरी सॅनिटायझर आणि मास्क वितरीत करणे शक्य

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे याचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लागणारे सॅनिटायझर्स, मास्क इत्यादी वैद्यकीय साहित्य प्रभागातील गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना विकत घेणे शक्य नाही. तसेच महापालिकेच्या दवाखान्यांमध्येही काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडेही अशाप्रकारची कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे ज्याप्रकारे आमदारांना आपल्या निधीतून ५० लाख रुपये विशेब बाब म्हणून खर्च करण्यास मुभा देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर महापालिकेने आपल्या सर्व नगरसेवकांना निधी उपलब्ध करून दिल्यास प्रभागातील नागरिकांना घरोघरी सॅनिटायझर आणि मास्क वितरीत करणे शक्य होईल.

- Advertisement -

महापालिकेच्या माध्यमातून या आजारांसंदर्भात सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या जात असल्या तरी नागरिकांकडून नगरसेवकांच्या अपेक्षा आहेत. परंतु महापालिकेच्या १८८८च्या नियमानुसार फक्त नागरी सुविधांकरताच नगरसेवक निधी खर्च करता येतो आणि त्यांचे निकष ठरवण्यात आलेले आहे. त्यामुळे नगरसेवकांना आपल्या निधीतून सॅनिटायझर्स, मास्क, तसेच गरीब आणि गरजूंना अन्नदान करण्याचा खर्च उचलावा लागतो. त्यामुळे अशाप्रकारचा निधी खर्च करण्यासाठी २५ लाख रुपयांपर्यंत मुभा दिल्यास प्रत्येक नगरसेवकांना मुभा दिल्यास, अशा सर्व वस्तू उपलब्ध करून देता येईल. त्यासाठी चालू अर्थसंकल्पातून २५ लाख रुपये उपलब्ध करून द्यावेत आणि यासाठी नगरविकास खात्याच्या माध्यमातून अधिनियमात तरतूद करूनही घेतली जावी. कोरोनासह भविष्यात तत्सम आजारांकरता हा निधी वापरता येऊ शकतो, असे जामसुतकर यांनी पत्रात म्हटले आहे. यापूर्वी भाजपचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी राज्याचे मुख्यमंत्र्यांना अशाप्रकारचे पत्र दिले होते. त्यानंतर आता नगरसेविका सोनम जामसुतकर यांनी हे पत्र देऊन सर्व नगरसेवकांच्या मनातील भावना मांडण्याच प्रयत्न केला आहे.


हेही वाचा – धक्कादायक : अंत्यसंस्कारासाठी गेले आणि कोरोनाबाधित झाले

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -