घरमुंबईवैमानिकाच्या तक्रारीनंतर एअर इंडियाचे दुबई-कोची विमान दुसरीकडे वळवले, मुंबईत सुरक्षित लँडिंग

वैमानिकाच्या तक्रारीनंतर एअर इंडियाचे दुबई-कोची विमान दुसरीकडे वळवले, मुंबईत सुरक्षित लँडिंग

Subscribe

एअर इंडियाच्या दुबई-कोची विमानासा दुसरीकडे वळवण्यात आले आहे. वैमानिकाच्या तक्रारीनंतर या विमानाचे मुंबईत सुरक्षित लँडिंग करण्यात आले. एअर इंडियाचे ड्रीमलायनर विमान दुबईहून कोचीला जात होते. यावेळी वैमानिकाने केबिनमधील दबाव कमी झाल्याचे’ सांगितल्यानंतर ते मुंबईकडे वळवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

बोइंग ७८७ फ्लाइट क्रमांक एआय-९३४ सुरक्षितपणे उतरल्याचे सांगण्यात आले. विमान वाहतूक नियामक DGCA ने या घटनेची चौकशी करण्यासाठी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना नियुक्त केले आहे. केबिनमधील दबाव कमी होने हा उड्डाण सुरक्षेचा एक गंभीर धोका आहे. ज्यासाठी वैमानिकांना त्वरीत प्रतिसाद देण्याचे प्रशिक्षण दिले जाते. सूत्रांनी सांगितले की, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय, डीजीसीएने या घटनेनंतर ड्रीमलायनर थांबवले असून चालक दलाची चौकशी सुरू आहे.

- Advertisement -

बुधवारी गो-एअरच्या विमानाची तुटली होती विंडशील्ड –

DGCA अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गो-एअरच्या G8-151 हे विमानाचे बुधवारी उड्डाण सुरू असताना  विंडशील्ड तुटले. हे विमान दिल्लीहून गुवाहाटीला जात होते. विंडशील्डला तडे गेल्याची माहिती वैमानिकाला मिळाली. मात्र, खराब हवामानामुळे विमान दिल्ली विमानतळावर उतरू शकले नाही. यानंतर त्याला जयपूरला वळवण्यात आले, जिथे त्याला सुरक्षितपणे उतरवण्यात आले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -