घरताज्या घडामोडीआरोप प्रत्यारोप, खळबळ, राडा आणि शक्ती प्रदर्शन राजकारण्यांचा नवा ट्रेंड

आरोप प्रत्यारोप, खळबळ, राडा आणि शक्ती प्रदर्शन राजकारण्यांचा नवा ट्रेंड

Subscribe

गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकारच्या ईडी आणि आयटी या यंत्रणा महाविकास आघाडी सरकारच्या मागे हात धुऊन लागल्या असून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने नुकतीच कारवाई केली. या कारवाईत त्यांची अलिबाग येथील मालमत्ता आणि दादरमधील राहते घर ईडीने जप्त केले. ईडीची ही कारवाई राऊतांच्या जिव्हारी लागली आहे. यामुळे सध्या त्यांनी भाजप विरोधी आपला पवित्रा अधिकच आक्रमक केला आहे. तसेच राऊतांवरील या कारवाईने शिवसैनिकही व्यथित झाला असून शिवसैनिकांमध्ये भाजपविरोधात जनक्षोम उसळला आहे. पण एकीकडे हे ईडीनाट्य सुरू असताना राऊतांनी राज्यसभेत थेट गृहमंत्री अमित शाह यांच्या नजरेला नजर भिडवत केलेली डोळ्याची भाषा देशाने बघितली. ईडीची कारवाई होऊनही न डगमगता थेट शहा यांनाच प्रश्न विचारणाऱ्या राऊतांचा हा शिवसेनी बाणा बघून शिवसैनिकांना बाळासाहेबांची शिवसेनाच आठवल्याचे बोलले जात आहे. याचपार्श्वभूमीवर, मुंबई विमानतळावर शिवसैनिकांनी शक्तीप्रदर्शन करत ढोल ताशाच्या गजरात दिल्लीहून परतलेल्या राऊत यांचे एखाद्या सैनिकाचे विजयी स्वागत करावे तसे जंगी स्वागत केले. यामुळे ईडीबरोबरच्या लढ्यात एकटे पडल्याची चर्चा असलेल्या राऊतांमागे शिवसेना आणि शिवसैनिक किती खंबीरपण उभा आहे हे देखील विरोधकांना दिसले. पण असे काही पहील्यांदाच होत नसून गेल्या काही महिन्यात अशा प्रकारे विरोधकांविरोधात बिगुल फुंकणाऱ्या नेत्यांचे जंगी स्वागत करून शक्तीप्रदर्शन करण्याचा हा नवीन ट्रेंड राजकारणात रुजत असल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

महिन्याभरापूर्वी फेब्रुवारीत पुण्यातील महानगरपालिकेत शिवसैनिकांच्या राड्यात पायऱ्यांवरून पडल्याने जखमी झालेले भाजपचे नेते किरिट सोमैय्या यांनाही समर्थन दर्शवण्यासाठी भाजपवाल्यांनी त्यांचा त्याच पायऱ्यांवर सत्कार केला होता. किरीट यांनी संजय राऊत यांच्यावर अनेक आरोप केले होते. ठाकरे सरकारने ब्लॅक लिस्टेट कंपनीला कोवीड सेंटरच कंत्राट देऊन भ्रष्टाचार केल्याचा आरोप सोमैय्या यांनी केला होता. तसेच कोरोना काळात महाविकास आघाडी सरकार जनतेच्या जीवाशी खेळल्याचा आरोप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या बेनामी कंपन्या असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. यामुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी सोमैय्या यांना थेट पायऱ्यावरूनच ढकलले होते. यामुळे त्याच पायऱ्यांवर सोमैय्या यांना हारतुरे घालून भाजपवाल्यांनी त्याचा सत्कार केला.

- Advertisement -

एखाद्या विजयी यात्रेचे स्वरुपच या कार्यक्रमाला देण्यात आले होते. अशा पद्धतीने नाकावर टिच्चून सत्कार, यात्रा, जंगी स्वागत करत विरोधकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा ट्रेंड महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर जास्तच वाढीस लागला आहे. त्याआधी फक्त चॅनेलवाल्यांसमोर येत आरोप प्रत्यारोप करण्याचा ट्रेंड होता. पण सध्या जे काही राज्यात सुरू आहे ते पाहता अशा प्रकारे एकमेकांना डिवचण्यासाठी, चिथवण्यासाठी आपली मतदारांची ताकद दाखवण्यासाठी असे स्वागत, सत्कार कार्यक्रम जाणीवपूर्वक केले जात आहेत.

गेल्या वर्षी टिकटॉकस्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी माजी वनमंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप असतानाही वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी मंदिर यात्रेत त्यांच्यासाठी समर्थकांनी रेड कार्पेट अंथरल्याचे पाहायला मिळाले होते.  कोरोना निर्बंद्ध झुगारून शक्तीप्रदर्शन करत राठोड यांच्या हजारो समर्थकांनी त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे दाखवून दिले होते. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात राठोड यांना जाणीवपूर्वक अडकवण्यात आल्याचा आरोप करत ते बंजारा समाजाचे असल्यानेच त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा डाव रचल्याचा आरोप करण्यात आला होता.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -