घरक्राइमकथित बॉडी बॅग घोटाळा : किशोरी पेडणेकरांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

कथित बॉडी बॅग घोटाळा : किशोरी पेडणेकरांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Subscribe

कोरोनाकाळात वैद्यकीय साहित्य खरेदीत भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी अटक टाळण्यासाठी केलेला अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळला.

मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबई महानगर पालिकेतील कथीत बॉडी बॅग घोटाळ्या प्रकरणी अनेकांची चौकशी सुरू आहे. यामध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही कारवाई करण्यात आली असून, दरम्यान त्यांनी केलेल्या अटकपूर्व जामिनास 29 ऑगस्ट रोजी न्यायालयाने फेटाळून लावला असून, त्यामुळे किशोरी पेडणेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार लटकत राहणार आहे. (Alleged body bag scam: Kishori Pednekar’s pre-arrest bail rejected)

कोरोनाकाळात वैद्यकीय साहित्य खरेदीत भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी अटक टाळण्यासाठी केलेला अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. या निर्णयाला पेडणेकर उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. असे जरी असले तरी मात्र तोपर्यंत त्यांच्यावर अटकेची तलवार कायम आहे.

- Advertisement -

आर्थिक गुन्हे शाखेने केला होता गुन्हा दाखल

कोविड काळात झालेल्या वैद्यकीय साहित्य खरेदीत भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पेडणेकर यांनी अटक टाळण्यासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती.

हेही वाचा : INDIA आघाडीच्या मुंबईतील बैठकीआधीच NDA ला गळती; वाचा- कोणत्या पक्षाने घेतली फारकत?

- Advertisement -

काय होता बॉडी बॅग घोटाळा?

मुंबईत मृत कोरोना रुग्णांना वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग 2 हजार रुपयांऐवजी सहा हजार 800 रुपयांना खरेदी केल्याचे ईडीने म्हटले आहे. हे कंत्राट तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचा आरोप ईडीने केला होता. कोविड काळात किशोरी पेडणेकर याच मुंबईच्या महापौर होत्या. त्यामुळे याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा : पराभवाच्या धास्तीने पछाडल्यानेच मोदी सरकारला महागाईची जाणीव- अतुल लोंढे

 

किरीट सोमय्यांनी केला होता घोटाळ्याचा आरोप

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी कोरोना काळात मुंबई महापालिकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. किशोरी पेडणेकर यांच्यावर बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. किशोरी पेडणेकर यांच्यासोबतच बीएमसीच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -