घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : बुधवार ३० ऑगस्ट २०२३

राशीभविष्य : बुधवार ३० ऑगस्ट २०२३

Subscribe

मेष : तुमचा उत्साह वाढेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात कोणता निर्णय घ्यावयाचा यांचा अंदाज बरोबर येईल. ध्येय गाठा.

- Advertisement -

वृषभ : प्रवासात, रस्त्याने चालताना काळजी घ्या. अडचण येईल. धंद्यात तणाव होईल. संयम ठेवा.

मिथुन ः महत्त्वाचे काम करून घ्या. जास्त भावनाप्रधान होऊ नका. नोकरीत प्रगती होईल. स्पर्धा जिंकाल.

- Advertisement -

कर्क : वृद्ध व्यक्तीचा प्रश्न सोडवता येईल. नोकरीत टिकून रहा. आप्तेष्ठ मदत करतील. एखादा ताण वाढू शकतो.

सिंह : अपेक्षित यश तुमच्या कार्यात तुम्हाला मिळेल. नवीन ओळख आकर्षक वाटेल. प्रतिष्ठा वाढेल.

कन्या ः धंद्यात जम बसेल. उधारीवर माल देऊ नका. वरिष्ठांना ओळखून मगच तुमचे मत व्यक्त करा.

तूळ : मनाची द्विधा अवस्था होईल. तुमच्या नावलौकीकात भर पडेल अशी घटना घडेल. अध्यात्मिक चमत्कार घडेल.

वृश्चिक : तुमच्या जीवनाला कलाटणी मिळेल. शारीरिक दोष कमी होऊन तुम्हाला तुमचे ध्येय गाठता येईल.

धनु : अविवाहितांना स्थळे मिळतील. मुलाचा प्रश्न सोडवता येईल. धंद्यात जम बसेल. प्रगतीचा मार्ग मिळेल.

मकर : ध्येयपूर्तीसाठी जास्त कष्ट घेण्याचे ठरवाल. लोकप्रियता वाढवण्यासाठी कामाची नीट आखणी करा.

कुंभ : तणाव कमी होईल. व्यवसाय वाढेल. कल्पनाशक्तीचा वापर करण्याची संधी मिळेल. पद मिळेल.

मीन : रागाच्या भरात विचित्र मार्ग धरू नका. वाहन जपून चालवा. धंद्यात मोठे काम मिळवता येईल.

- Advertisment -