घरमुंबईफॅक्टरीच्या कँटीनमध्ये कर्मचाऱ्याची आत्महत्या

फॅक्टरीच्या कँटीनमध्ये कर्मचाऱ्याची आत्महत्या

Subscribe

अंबरनाथ येथे रविवारी रात्री ऑर्डनन्स फॅक्टरीमधील कँटीनमध्ये कामाला असलेल्या संजीव बेहनवाल या कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

अंबरनाथ येथे काल, रविवारी रात्री ऑर्डनन्स फॅक्टरीमधील कँटीनमध्ये कामाला असलेल्या संजीव बेहनवाल या कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संजीव कमलसिंग बेहनवाल (वय २६) हा त्याच्या नातेवाईकांसह उल्हासनगर -३ येथील फालवर लाईन परिसरात राहात होता. संजीवचे वडील कमलसिंग बेहनवाल हे ऑर्डनन्स फॅक्टरी येथे कामाला होते. ७ वर्षांपूर्वी कमलसिंग यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी संजीव कामाला लागला होता. त्याची नियुक्ती कँटीनमध्ये झाली होती. काल रात्री तो रात्रपाळीला आलेला होता. रात्री २. ३० वाजताच्या सुमारास त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे इतर कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच आज ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये आयोजित करण्यात आलेला शस्त्र प्रदर्शनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -