घरताज्या घडामोडी...म्हणून अमृता फडणवीसांनी दिला इंदुरीकरांना सल्ला

…म्हणून अमृता फडणवीसांनी दिला इंदुरीकरांना सल्ला

Subscribe

इंदुरीकर महाराजांविषयी मला आदर आहे, मात्र त्यांनी महिलांना कमी लेखले जाईल किंवा त्यांचा मान कमी होईल असे विधान करू नये, असा सल्ला देत याप्रकरणात उडी घेतल्याचे दिसते आहे.

इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यावर भाष्य करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी त्यांना सल्ला दिला आहे. यावेळी त्यांनी ‘इंदुरीकर महाराजांविषयी मला आदर आहे, मात्र त्यांनी महिलांना कमी लेखले जाईल किंवा त्यांचा मान कमी होईल असे विधान करू नये’, असा सल्ला देत याप्रकरणात उडी घेतल्याचे दिसते आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. याप्रकरणी आपली ठाम भुमिका मांडत अशा अनेक मुद्यांवर  त्यांनी भाष्य केले आहे.

नेमके काय म्हणाल्या अमृता?

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या पत्नी अमृता फडणीस या अनेकदा विविध मुद्यांवर भाष्य करत आपली ठाम भुमिका मांडत असतात. मागील काही दिवसांपूर्वी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर टिका करत आपलं मत व्यक्त केलं होतं, आणि आता इंदुरीकर महाराजांच्या प्रकरणात उडी घेत त्यांना सल्ला दिला आहे. यावेळी त्यांनी म्हटले आहे की, ‘मला इंदुरीकर महाराजांबद्दल आदर आहे. त्यांनी दिलेले सल्ले जीवनात उपयोगी पडतात असे सांगताना त्या पुढे म्हणाल्या लोकांवर प्रभाव पाडणाऱ्या व्यक्तींनी केलेल्या वक्तव्याचा अधिक प्रभाव पडत असतो म्हणून आपण काय बोलता आहेत याचे भान ठेवायला हवं,’ असे अमृता फडणवीस यांनी या मुलाखतीत सांगितले आहे.

- Advertisement -

रश्मी ठाकरे या ‘फर्स्ट लेडी ऑफ महाराष्ट्र’

अमृता फडणवीस यांनी या मुलाखतीत आपल मत मांडताना इतरही अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंची स्तुती करत, त्या अनेकांचे आदर्श असल्याचे देखील त्या म्हणाल्या आहेत. यावेळी त्यांनी रश्मी ठाकरेंना इंस्पायरींग वूमन म्हणत ‘फर्स्ट स्लेडी ऑफ महाराष्ट्र’ असा उल्लेख त्यांनी केला आहे. यासोबतच त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यात महिला मुख्यमंत्री होण्याच पोटेन्शिअल आहे, असे म्हणाल्या. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मुद्यावर आपण अजूनही ठाम असल्याचे त्यांनी मुलाखती दरम्यान सांगितले आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, ‘मुख्यमंत्रीपदी असताना देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी अनेक कामे केले आहेत. त्यामुळे अशा व्यक्तीला महिलांची माफी मागायला लावणे योग्य नव्हते’, असे त्या म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -