घरमुंबईठाण्यात लोकसभेच्या उमेदवारीवरून घोषणाबाजी सुरु

ठाण्यात लोकसभेच्या उमेदवारीवरून घोषणाबाजी सुरु

Subscribe

ठाणे लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँगेसचे माजी मंत्री गणेश नाईक यांच्या नावाची अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. मात्र नाईक हे लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचे आता स्पष्ट झाले आहे.

आरोग्यमय, पर्यावरणपूरक आणि स्वच्छ नवी मुंबईचा संदेश देण्यासाठी नवी मुंबई महासायक्लोथोनचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा शुभारंभ माजी मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते अरेजां सर्कल वाशी येथे झाला. त्यावेळी नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधताना, या वयातही आपण ठाण्यापर्यंत जाऊ शकतो, असे सूचक वक्तव्य केले. या वक्तव्याबाबत त्यांनी अधिक स्पष्टीकरण दिले नसले तरी आगामी लोकसभा निवडणूकीची ही तयारी असल्याचे बोललं जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँगेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्याने ठाणे, कल्याण हे दोन मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आले आहेत.

पवारांची नाईकांना पसंती 

ठाण्यातून गणेश नाईक यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा खुद्द शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीतही ठाण्यातून गणेश नाईक यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली होती. मात्र नाईक कुटूंबियांकडून यावर कोणतीच प्रतिक्रिया आली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मनसेला आघाडीत सामील करून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र मनसेकडूनही अजूनही कोणताच निर्णय झालेला नाही. दरम्यान, नाईक यांचे सूचक वक्तव्य हे ठाण्यातील लोकसभेची तयारी असल्याचेच बोलले जात आहे. त्यामुळे ठाणे लोकसभा मतदार संघातून गणेश नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असणार हे जवळपास निश्चितच समजलं जात आहे.

- Advertisement -

ठाण्यात येण्याची इच्छा 

ठाणे लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँगेसचे माजी मंत्री गणेश नाईक यांच्या नावाची अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. मात्र नाईक हे लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचे आता स्पष्ट झाले आहे. वयाची ६९ वर्ष गाठली असून, आजही मी ठाण्यापर्यंत जाऊ शकतो, असे सूचक वक्तव्य नाईक यांनी केले. त्यामुळे नाईक लोकसभेच्या रिंगणात उतरणार हे जवळपास निश्चित झाल्याचेच दिसून येत आहे.

२०१४ च्या मोदी लाटेचा फटका बसला 

२००९ च्या ठाणे लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर संजीव नाईक हे विजयी झाले होते. नाईक यांना ३ लाख मते मिळाली होती. तर शिवसेनेकडून विजय चौगुले आणि मनसेकडून राजन राजे हे रिंगणात होते. चौगुले यांना अडीच लाख तर राजे यांना दीड लाखाच्या आसपास मते मिळाली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत राष्ट्रवादी काँग्रेसला हा मतदारसंघ गमवावा लागला. शिवसेनेचे राजन विचारे हे खासदार बनले. त्यावेळी राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार संजीव नाईक यांना पराभव झाला हेाता. हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात मिळवण्यासाठी २०१९ च्या निवडणुकीत माजी मंत्री गणेश नाईक यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यासाठी शरद पवार आग्रही असल्याचे बोलले जात आहे.

ठाणे लोकसभा २०१४ निकाल

  • रांजन विचारे (शिवसेना) – ५ लाख ९५ हजार ३६४
  • संजीव नाईक (राष्ट्रवादी) – ३ लाख १४ हजार ६५
  • अभिजीत पानसे (मनसे) – ४८ हजार ८६३
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -