घरमुंबईराज्यात 'ठाणे महापालिका' अव्वल; राज्यस्तरीय सर्वोच्च पुरस्कार

राज्यात ‘ठाणे महापालिका’ अव्वल; राज्यस्तरीय सर्वोच्च पुरस्कार

Subscribe

उर्जा संवर्धनात ठाणे महापालिका पुन्हा एकदा अव्वल ठरली आहे. उर्जा संवर्धन, उर्जा कार्यक्षमता आणि अपारंपारिक उर्जेचा वापर या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी ही महापालिका ठरली असून राज्य शासनाच्या महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरणाच्यावतीने राज्यस्तरीय सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

गेली अनेक वर्षे उर्जा संवर्धन, उर्जा कार्यक्षमता आणि अपारंपारिक उर्जेचा वापर या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी ठाणे महापालिका राज्यात पुन्हा एकदा अव्वल ठरली आहे. १३ व्या उर्जा संवर्धन आणि व्यवस्थापन या दोन राज्यस्तरीय सर्वोच्च पुरस्काराने महापालिकेचा सन्मान करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपूर येथे पार पडलेल्या भव्य समारंभात पालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर आणि विद्युत विभागाचे उपनगर अभियंता सुनील पोटे यांनी हा पुरस्कार स्विकारला आहे. गेली १३ वर्षे ठाणे महानगरपालिका उर्जा संवर्धन, उर्जा कार्यक्षमता या क्षेत्रात सातत्याने पुरस्कार मिळविणारी ठाणे महानगरपालिका ही एकमेव महापालिका ठरली आहे.

‘सर्टिफिकेट ऑफ मेरिट’ पुरस्काराने पालिकेचा सन्मान

ठाणे महापालिकेच्या राज्यस्तरिय आणि राष्ट्रीय पातळीवरीवरी विविध प्रकल्पांची दखल घेऊन राज्य शासनाच्या महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरणच्या १३ व्या उर्जा संवर्धन आणि व्यवस्थापनाच्या दोन राज्यस्तरीय सर्वोच्च पुरस्काराने महापालिकेचा सन्मान करण्यात आला आहे. त्याचबरोबर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय येथे हाती घेतलेल्या उर्जा संवर्धनाच्या विविध प्रकल्पांची दखल घेवून ‘सर्टिफिकेट ऑफ मेरिट’ या विशेष पुरस्काराने ठाणे महानगरपालिकेचा सन्मान करण्यात आला.

- Advertisement -

महानगरपालिकेने पथदिव्यांसाठी एलईडी लाईटचा केलेला प्रभावी वापर, महापालिकेच्या इमारतींमध्ये उर्जा संवर्धन उपकरणांचा वापर, महापालिकेच्या विविध इमारती, शाळांवर सौर उर्जा प्रकल्प, सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रीक बसला चालना, तसेच युएनडीपी प्रकल्पातंर्गत डिस्ट्रीक्ट कुलींग प्रकल्पासाठी ठाणे महानगरपालिकेची केलेली निवड या सर्व बाबींचा विचार करून राज्य शासनाच्या माहाराष्ट्र उर्जा विकास अभिकरणाच्यावतीने ठाणे माहनगरपालिकेचा सन्मान करण्यात आला आहे.


हेही वाचा – ठाणे महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदाचा पेच कायम

- Advertisement -

हेही वाचा – दिव्यांग अ‍ॅथलेटिक्स खेळाडूला ठाणे महापालिका देणार ५० लाख !


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -