घरमुंबईदैनिक आपलं महानगरच्या कार्यालयात चोरी करणार्‍या गुन्हेगारास अटक

दैनिक आपलं महानगरच्या कार्यालयात चोरी करणार्‍या गुन्हेगारास अटक

Subscribe

दैनिक आपलं महानगरच्या माहीमच्या कार्यालयात १० ऑक्टोबर २०१९ रोजी झालेल्या घरफोडीप्रकरणी वॉण्टेड असलेल्या एका रेकॉर्डवरील आरोपीस माहीम पोलिसांच्या एका विशेष पथकाने शनिवारी अटक केली. अजगरअली अब्दुल रजाक शेख असे या 27 वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने शुक्रवार 3 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अजगरअली हा लसून पॅकिंगचे काम करीत असून त्याच्याविरुद्ध मुंबईसह ठाणे शहरात घरफोडींच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्याकडून पोलिसांनी दै. आपलं महानगरमधून चोरलेला पाच डी कॅनन कंपनीचा कॅमेरा हस्तगत केल्याचे एपीआय प्रविण खराडे यांनी सांगितले.

दै. आपलं महानगरच्या कार्यालयात १० ऑक्टोबर २०१९ च्या भल्या पहाटे चोरी झाली होती. चोरट्याने खिडकीतून कार्यालयात प्रवेश करून पाच डी कॅनन हा कॅमेरा चोरला होता. तसेच कार्यालयातील संगणकाची तोडफोड केली होती. हा चोरट्या कार्यालयात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. या चोरीबद्दल माहिम पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध 454, 457, 380 भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरीष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गदनकुश यांच्या पथकातील प्रविण खराडे, सुरेश वळवी, प्रमोद सोनावणे, महेंद्र तटकरे यांनी आरोपीचा शोध सुरु केला होता.

- Advertisement -

ही शोधमोहीम सुरु असतानाच अजगरअली शेख याला वर्तकनगर परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी चोरीला गेलेला कॅनन कंपनीचा महागडा कॅमेरा जप्त केला. अजगरअली हा चेंबूर येथील पेस्तमसागर, रोड क्रमांक चार, गल्ली क्रमांक दोनच्या रुम क्रमांक 39 मध्ये त्याची पत्नी जुबेदासोबत राहतो. तो लसूण पॅकिंगचे काम करत असून रात्रीच्या वेळेस घरफोडी करतो. त्याच्याविरुद्ध वर्तकनगर, माहीमसह इतर पोलीस ठाण्यात घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. यापूर्वी त्याला अशाच काही गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली होती. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे एपीआय प्रविण खराडे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -