घरमुंबईप्रियकराला अद्दल घडविण्यासाठी प्रेयसीकडून बहिणीची बदनामी

प्रियकराला अद्दल घडविण्यासाठी प्रेयसीकडून बहिणीची बदनामी

Subscribe

प्रियकराने दुसर्‍या तरुणीसोबत लग्न केल्यामुळे प्रेयसी दुखावली. तिने पुढचा, मागचा विचार न करता प्रियकराच्या बहिणीचे फेसबुक वर अश्लिल प्रोफाईल तयार करुन त्यांना प्रचंड मानसिक त्रास दिला. त्या प्रेयसीला पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली.

प्रेम संबंधात दुखावली गेलेली तरुणी कुठल्या स्तरापर्यंत जाऊ शकते, याचा नमुना मुंबईतील एका घटनेत पहायला मिळाला. प्रियकराने दुसर्‍या तरुणीसोबत लग्न केल्यामुळे प्रेयसी दुखावली. तिने पुढचा, मागचा विचार न करता प्रियकराच्या बहिणीचे फेसबुक वर अश्लिल प्रोफाईल तयार केले. त्यांना प्रचंड मानसिक त्रास दिला. त्या प्रेयसीला पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. तक्रारदार तरुणी ही विलेपार्ले येथे तिच्या कुटुंबियांसोबत राहते. काही दिवसांपूर्वी तिला अज्ञात व्यक्तीचे फोन येत होते. ती व्यक्ती तिच्याशी अश्लील संभाषण करीत होते. तक्रारदार तरुणी आणि तिच्या बहिणीचे कोणीतरी फेसबुकवर चार बोगस अकाऊंट उघडले असून त्यात तिच्या मोबाईल क्रमांकासह अश्लील फोटो आणि व्हिडीओ अपलोड केल्याचे समजले. इतकेच नव्हे तर या व्यक्तीने याच फेसबुकवरुन तिच्या मित्रमैत्रिणीसह नातेवाईकांना फ्रेण्ड्स रिक्वेस्ट पाठवून तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता.

प्रेयसीला गुन्हे शाखेकडून अटक

याबाबत २३ जूनला लेखी अर्जाद्वारे विलेपार्ले पोलिसांत तक्रार करण्यात आली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. या गुन्ह्यांचा संमातर तपास गुन्हे शाखेचे अधिकारी करीत होते. यावेळी सायबर सेल विभागाची मदत घेऊन पोलिसांनी संबंधित चारही फेसबुक अकाऊंड ब्लॉक करुन जास्तीत जास्त माहिती काढण्याचा प्रयत्न सुरु केला होता. फेसबुक प्रोफाईलची लिंक सायबर सेलकडे पाठविण्यात आली होती. फेसबुकवर तक्रारदार महिलेचा मोबाईल क्रमांक असल्याने पोलिसांना आरोपींची काहीच माहिती मिळत नव्हती. मात्र गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी जिद्द कायम ठेवून आरोपीचा शोध सुरु केला होता. याच दरम्यान गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना मिळालेल्या माहितीवरुन रविवारी एका २२ वर्षांच्या तरुणीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

- Advertisement -

आठ वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर प्रियकराचे दुसर्‍या तरुणीशी लग्न

तक्रारदार तरुणीच्या भावासोबत या तरुणीचे प्रेमसंबंध होते. गेल्या आठ वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र अंतर्गत वादातून त्यांच्यात दोन वेळा ब्रेकअप झाला होता. त्यातच तिच्या भावाने गेल्या महिन्यात दुसर्‍या तरुणीशी लग्न केले होते. या लग्नाची माहिती मिळताच तिला राग अनावर झाला. प्रियकराला अद्दल घडविण्यासाठी तिनेच फेसबुकवर प्रियकराच्या दोन्ही बहिणीचे चार बोगस अकाऊंट तयार करुन त्यात खोटी माहिती दिली होती. या दोघींचे मोबाईल क्रमांक, अश्लील मॅसेज, फोटो आणि व्हिडीओ अपलोड केले होते. त्याने तक्रारदार तरुणीला नाहक त्रास झाला होता. या कबुलीनंतर तिला रविवारी पोलिसांनी अटक केली. फेसबुक अकाऊंट उघडताना तिने पूर्ण काळजी घेतली होती, मात्र तिला एक महिन्यांत कुठलाही पुरावा नसताना पोलिसांनी शिताफीने अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -