अंधेरीतील गोखले पूल दुरुस्तीसाठी बंद असल्याने मेट्रोला पसंती प्रवासी संख्येत 11 हजारांची वाढ

ही वाढ लक्षात घेऊन गरज भासल्यास अतिरिक्त मेट्रो गाड्या सोडण्यात येणार आहे.

मुंबईतील अंधेरी (andheri) येथे असलेला गोखले पूल (gokhale bridge)जुना झाल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पुढील दोन वर्षे अंधेरी मधील हा गोखले पूल दुरीस्तीसाठी बंद राहील. परिणामी वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो 1 मार्गिकेवरील प्रवाश्यांच्या संख्येत 11 हजारांनी वाढ झाली आहे. कोरोनानंतर मेट्रो 1 मार्गिकेची दैनंदिन प्रवासी संख्या पहिल्यांदाच चार लाखांवर पोहोचण्याची शक्यता आहे. अशातच गोखले पूल बंद राहणारे असल्याने परवाशांच्या संख्येत आणखी वाढीची अपेक्षा मेट्रो 1 प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.

अंधेरी (andheri )पूर्व पश्चिम आणि तिथूनच पुढे वर्सोवा, पश्चिम भागाला जोडण्यासाठी गोखले पूल महत्त्वाचा आहे. पण आता तो दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अंधेरीकडून वर्सोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मेट्रोवरचा भार वाढला आहे. सोमवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रवासी संख्येत 11 हजारांनी वाढ झाली होती. यामध्ये सर्वाधिक प्रवासी अंधेरी पश्चिमेकडील आझाद नगर मेट्रो स्थानकावर आहे. त्याखालोखालच डी. एन. नगर आणि वर्सोवा मेट्रो (versova metro station) स्थानकावरही प्रवाशांची संख्या वाढली. ही वाढ लक्षात घेऊन गरज भासल्यास अतिरिक्त मेट्रो गाड्या सोडण्यात येणार आहे.

दरम्यान कोरोनाकाळापूर्वी मेट्रो १मधून प्रतिदिन 4 लाख ते 4 लाख 50 हजार प्रवासी प्रवास करत होते. लॉकडाउनमध्ये मेट्रो सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर 18 ऑक्टोबर 2020 पासून मेट्रो सेवा पुन्हा सुरु झाली. मेट्रो प्रवास पुन्हा सुरू झाल्याने सुरुवातीला फक्त 13 हजार प्रवासी होते. त्यानंतर मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रवासी संख्येत वाढ होऊन 1 लाखापर्यंत आकडा पोहोचला. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आल्याने प्रवाशांची संख्या 50 हजारांहून कमी झाली.

त्यानंतर मागील महिन्यात डिसेंबरमध्ये कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढू लागली. मेट्रोची प्रवासी संख्या कोरोनानंतर पहिल्यांदाच 2 लाखांपेक्षा पुढे गेली. दरम्यान मागील काही महिन्यांमध्ये मेट्रो प्रवासी संख्या 3 लाख 50 हजार ते 3 लाख 80 हजार एवढी होती. मात्र आता अंधेरीमधील गोखले पूल बंद केल्याने प्रवासी पुन्हा मेट्रोकडे वळण्याची चिन्हे आहेत. त्यामुले मेट्रो सेवेवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे.


हे ही वाचा –  ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो ठाण्यात राष्ट्रवादीने पाडला बंद