रुग्णाने शिवराळ भाषा वापरल्याने राजावाडी रुग्णालयात नर्स संघटनेचे आंदोलन

रूग्णालय प्रशासनाने केलेल्या तक्रारीत कलम ५०९ वापरण्यात आले आहे. रुग्णाने शिवराळ भाषा वापरून सरकारी कामात अडथळा आणल्याने कलम ३५३ चा समावेश करण्याची मागणी कामगार सेनेतर्फे अध्यक्ष बाबा कदम, सुनील चिटणीस, रंजना नेवाळकर व राजावाङी रुग्णालयातील दक्षता कमिटी सदस्य प्रकाश वाणी यांनी केली आहे.

मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात एका रुग्णाने नर्सला शिवीगाळ (patient used abused language to nurse) केल्याने संतप्त नर्सच्या संघटनेने सोमवारी काही काळ काम बंद आंदोलन केले  (nurses
association staged agitation). शिवराळ भाषा वापरणाऱ्या रुग्णाविरोधात कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. दरम्यान, रूग्णालय प्रशासनाने शिवराळ भाषा वापरणाऱ्या रुग्णाच्या विरोधात टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

राजावाडी रूग्णालय समितीवरील सदस्य प्रकाश वाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजावाडी रुग्णालयात एमआयसीयू कक्षात दाखल नूर महंमद या रुग्णाने बेडवरील चादर बदलण्याच्या विषयावरून नर्स हेमलता बांगर यांना अश्लील शिवराळ व धमकीवजा भाषा वापरली. त्यामुळे त्या दुखावल्या गेल्या. त्यांनी याबाबत रूग्णालय प्रशासन व म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेकडे तक्रार केली.

रूग्णालय प्रशासनाने केलेल्या तक्रारीत कलम ५०९ वापरण्यात आले आहे. रुग्णाने शिवराळ भाषा वापरून सरकारी कामात अडथळा आणल्याने कलम ३५३ चा समावेश करण्याची मागणी कामगार सेनेतर्फे अध्यक्ष बाबा कदम, सुनील चिटणीस, रंजना नेवाळकर व राजावाङी रुग्णालयातील दक्षता कमिटी सदस्य प्रकाश वाणी यांनी केली आहे. यावेळी, कामगार सेनेतर्फे चंद्रपाल चंदेलिया, सचिन भागे, विलास लिगाडे व राजावाङी रुग्णालयातील कर्मचारी वर्ग परिचारिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.