घरमुंबईभाजपा आमदार-खासदारांना आशिष देशमुख लिहिणार पत्र

भाजपा आमदार-खासदारांना आशिष देशमुख लिहिणार पत्र

Subscribe

नुकताच आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलेले भाजपाचे आमदार आशिष देशमुख आता सरकारमधील भाजपा आमदार - खासदारांना पत्र लिहिणार आहे. यामध्ये ते भाजप सोडा, असे आवाहन करणार आहेत.

नुकताच आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलेले भाजपाचे आमदार आशिष देशमुख आता अधिकच आक्रमक झाले आहेत. त्यांनी आता या सरकारविरोधातील आपली विरोधाची धार अधिक तीव्र केली आहे. आता तर ते सरकारमधील भाजपा आमदार – खासदारांना हे सरकार काहीही करू शकत नाही, असे सांगून त्यांना देखील आमदारकी आणि खासदारकी सोडा, असे पत्र लिहिणार असल्याची माहिती त्यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. आमदार आणि खासदार यांच्या अंतर्मनाला साद घालणारे पत्र लिहून या आमदार-खासदारांनी आपल्या विवेकाला आणि अंतर्मनाला स्मरून योग्य निर्णय घ्यावा, अशी हाक पत्राद्वारे करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हे सरकार वांझोटे

आज समाजातील प्रत्येक घटक या सरकारवर नाराज आहे. हे सरकार काहीही करू शकले नाही. त्यामुळे हे सरकार नपुंसक आणि वांझोटे असल्याची घणाघाती टीका त्यांनी यावेळी केली. तसेच या सरकारवर शेतकऱ्यांना अजिबात भरवसा राहिलेला नाही. शेतकरी आणि शेतकऱ्यांचे कुटुंब सध्या या सरकारला वैतागले झाल्याचा आरोपदेखील त्यांनी यावेळी केला. २०१८ ला मॅग्नेटिक महाराष्ट्राची तसेच २०१५ ला मेकिंग इंडियाची घोषणा या सरकारने केली. पण काहीच झाले नाही, उलट बेरोजगारी वाढल्याचे सांगत त्यांनी यावेळी भाजपावर जोरदार टीका केली. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे सरकार जनतेची जशी दखल घेत नाही तशी लोकप्रतिनिधींची देखील दखल घेत नसल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.

- Advertisement -

यापुढे दिल्लीत जाईन

मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तो लवकरात लवकर स्वीकारावा तसेच मी अजून कोणत्या पक्षात जाणार हे जरी ठरवले नसले तरी मला आता राज्यापेक्षा दिल्लीत जायला आवडेल, असे देखील त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -