घरदेश-विदेशसरकारचं न्यू इयर गिफ्ट; सिलिंडर १२० रुपयांनी स्वस्त!

सरकारचं न्यू इयर गिफ्ट; सिलिंडर १२० रुपयांनी स्वस्त!

Subscribe

नव्या वर्षात विनाअनुदानित सिलिंडर झाला १२० रुपयांनी स्वस्त

जगभरात २०१९ च्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरु असताना वर्षाच्या शेवटी केंद्र सरकारने एलपीजी धारकांना एक मोठं गिफ्ट दिलं आहे. विनाअनुदानित गॅस सिलिंडर १२० रुपयांनी स्वस्त करण्यात आला आहे. तर अनुदानित सिलिंडरच्या किमतीत ५ रुपयांची घट करण्यात आली असल्याची माहिती इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं दिली आहे.

- Advertisement -

हे आहेत सिलिंडरचे दर

सिलिंडरचे दर कमी केल्याने १४. २ किलोचा अनुदानित सिलिंडर ५००.९० रुपयांऐवजी आता ४९४.९९ रुपयांना मिळणार आहे. हे दर मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. भारतातील सर्वात तेल पुरवठादार कंपनी असलेल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं ही माहिती दिली आहे. एलपीजी सिलिंडरचे या महिन्यात दुसऱ्यांदा दर कमी करण्यात आले आहेत. १ डिसेंबर रोजी अनुदानित सिलिंडरचे दर ६.५० रुपयांनी कमी केले होते आणि आज पुन्हा एकदा मोठ्या रक्कमेने सिलिंडरचे दर कमी झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -