घरताज्या घडामोडी'युवराजा'ला वाचवायला महाराष्ट्रालाच खोटं ठरवताय?' - आशिष शेलार

‘युवराजा’ला वाचवायला महाराष्ट्रालाच खोटं ठरवताय?’ – आशिष शेलार

Subscribe

रिपब्लिक न्यूज चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक झाली आणि राज्यात यावरून राजकारण सुरू झालं. भाजपनं हा थेट माध्यम स्वातंत्र्यावरच घाला असल्याचं म्हणत शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारवर टीका करायला सुरुवात केली. भाजपचे तब्बल ९ केंद्रीय मंत्री अर्णब गोस्वामी यांच्या बाजूने मैदानात उतरले असताना आज सकाळी शिवसेनेने आपल्या मुखपत्र सामनामधून या मुद्द्यावरून भाजपवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. शिवसेनेच्या भूमिकेवर आता भाजपकडून आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्या ट्वीटर अकाऊंटवर दोन ट्वीट करून आशिष शेलार यांनी थेट शिवसेना, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना टार्गेट केलं आहे.

काय म्हणाले आशिष शेलार?

आपल्या ट्वीटमध्ये आशिष शेलार म्हणतात, ‘रोज अस्मितेची ढाल काढून त्यामागे लपणे तुम्ही आधी थांबवा! अन्वय नाईक यांना न्याय मिळायलाच हवा. पण एक मराठी कुटुंब उभं करून तुम्ही रिया चक्रवर्तीला का वाचवताय? एका मराठी कुटुंबाची ढाल करून ‘दिशा सालियन’बाबत बोलणाऱ्यांची तोंडं का बंद करताय? बात और भी निकलेगी.. त्यावेळी आमच्या महाराष्ट्र पोलिसांनी केलेला तपास आणि संपूर्ण पोलीस दल यांना खोटे ठरवून आता एका ‘सिंह’ यांना ‘परमवीर’ का देताय? खरी नौटंकी तर हीच आहे. एका ‘युवराज’ला वाचवायला महाराष्ट्रालाच का खोटे ठरवताय? पत्रपंडित हो, अग्रलेखाच्या शाईचे डाग तुमच्या सदऱ्यावर दिसू लागलेत?’

- Advertisement -

- Advertisement -

काय म्हटलंय आजच्या सामना अग्रलेखात?

‘मुंबईतील एका वृत्तवाहिनीचा मालक, संपादक असलेल्या अर्णब गोस्वामी यास एका अत्यंत खासगी प्रकरणात अटक झाली. त्याच्या अटकेचा राजकारणाशी, पत्रकारितेशी संबंध नाही. गोस्वामी यांनी टिळक-आगरकरांप्रमाणे सरकारविरोधात जहाल लिखाण केले. त्यामुळे सरकारने त्यांची गचांडी पकडली असे काही हे प्रकरण नाही. दोन वर्षांपूर्वी अलिबाग निवासी अन्वय नाईक व त्यांच्या आईच्या आत्महत्येशी संबंधित ही अटक आहे. गोस्वामी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आता चौकशीत काय ते सत्य बाहेर येईल. यात ‘आणीबाणी’ आली, काळा दिवस उजाडला, पत्रकारितेवर हल्ला झाला, असे काय आहे? सीतेवर आरोप होताच श्रीरामानेही सीतेवर अग्निपरीक्षेची वेळ आणली. ते तर रामराज्य होते. सीतेची अग्निपरीक्षा म्हणजे आजच्या बेगडी रामभक्तांना आणीबाणी किंवा श्रीरामाची हुकूमशाही वाटली काय? एका निरपराध माणसाची आत्महत्या त्यांच्या वृद्ध आईसह झाली. त्यांची पत्नी न्यायासाठी आक्रोश करीत आहे. पोलिसांनी कायद्याचे पालन केले. यात चौथा स्तंभ कोसळला असे सांगणारे लोकशाहीतील पहिल्या स्तंभास उखडू पाहत आहेत. एका नौटंक्यासाठी रडणे, छाती बडवणे बंद करा!’ असं म्हणत शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -