घरCORONA UPDATEतब्बल दहा दिवसानंतर अशोक चव्हाण यांना मिळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

तब्बल दहा दिवसानंतर अशोक चव्हाण यांना मिळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

Subscribe

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना आज डिस्चार्ज मिळाला. गेल्या २५ मे रोजी ते मुंबईच्या रूग्णालयात दाखल झाले होते. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. उपचारासाठी काही दिवसांपूर्वी ते नांदेडहून मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. अखेर आज त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांना २४ मे रोजी कोरोनाचे निदान झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर मुंबई येथे उपचार घेण्यासाठी हालचाली सुरु झाल्या होत्या. पुढे २५ मे ला नांदेड ते मुंबई असा ५७४ किमी आणि १२ तासांचा प्रवास करून अशोक चव्हाण रुग्णवाहिकेतून मुंबईत दाखल झाले.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಜೂನ್ 4, 2020

- Advertisement -

हॉस्पिटलमधूनही होते पक्षकार्यात सक्रिय 

हॉस्पिटलमध्ये असतानाही अशोक चव्हाण हे पक्षाच्या कार्यामध्ये सक्रिय होते. त्यांनी व्हिडिओद्वारे संदेश देत काँग्रेस पक्षाच्या मोहिमेत सक्रिय सहभाग दर्शवला होता. कोरोनामुळे हतबल झालेल्या देशातील कोट्यवधी नागरिकांचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे अभियान राबवले होते. या अभियानात अशोक चव्हाण यांनी सहभाग दर्शवत केंद्र सरकारनेही या मागण्या मंजूर कराव्यात, अशी विनंती व्हिडिओच्या माध्यमातून केली होती.

हेही वाचा –

माल्ल्यानं पुन्हा गंडवलं; इतक्यात भारताकडे प्रत्यार्पण नाहीच!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -