घरमुंबई'आमचं संख्याबळ कमी झालं असलं तरी अकेला देवेंद्र काफी है'; भातखळकरांचा महाविकास...

‘आमचं संख्याबळ कमी झालं असलं तरी अकेला देवेंद्र काफी है’; भातखळकरांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

Subscribe

विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या जोरदार गदारोळानंतर भाजपच्या १२ आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे. गैरवर्तन करणाऱ्या आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा आरोप जाधव यांनी केल्यानंतर संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव सादर केला. तो प्रस्ताव बहुमताने मंजूर झाला. यापार्श्वभूमीवर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी भास्कर जाधव यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर देखील जोरदार हल्लाबोल केल्याचे दिसून आले.

संख्याबळ कमी झालं तरी अकेला देवेंद्र काफी है

तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांचं नाव डांबराने लिहिलं जाईल. धक्काबुक्की कुणीही केली नाही. शिवसेना आमदारानेच शिवीगाळ केली आहे. आपण गोंधळावेळी डायसवरही गेलो नव्हतो, पण शिवसेनेवर, सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतो म्हणून माझे निलंबन करण्यात आले आहे. ओबीसी आरक्षणासाठी १०६ आमदारांचे निलंबन केले तरीही आम्ही हा लढा सुरुच ठेवू. आमचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत. ते सांगतील त्या प्रमाणे लढाई लढण्यात येईल. आमचं संख्याबळ कमी झाले असले तरी अकेला देवेंद्र काफी है, अशी जोरदार टीका अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.

- Advertisement -

निलंबन झालेल्या आमदारांची नावे

  • डॉ. संजय कुटे, जळगाव जामोद, बुलढाणा
  • आशिष शेलार, वांद्रे पश्चिम
  • अभिमन्यू पवार, औसा, लातूर
  • गिरीश महाजन, जामनेर, जळगाव
  • अतुल भातखळकर, कांदिवली पूर्व, मुंबई
  • पराग अळवणी, विलेपार्ले, मुंबई
  • हरिश पिंपळे, मूर्तिजापूर, अकोला
  • राम सातपुते, माळशिरस, सोलापूर
  • जयकुमार रावल, सिंदखेडा, धुळे
  • योगेश सागर, चारकोप, मुंबई
  • नारायण कुचे, बदनापूर, जालना
  • कीर्तिकुमार भांगडिया, चिमूर, चंद्रपूर

 

 

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -