घरमुंबईपश्चिम रेल्वे बसवणार स्वयंचलित पर्जन्यमापक

पश्चिम रेल्वे बसवणार स्वयंचलित पर्जन्यमापक

Subscribe

पावसात रेल्वे सेवेेचे नियोजन करणे होणार शक्य

पावसाळ्यात मुसळधार पावसाने रेल्वे रुळांवर पाणी साचून लोकल सेवा ठप्प होणे हे दरवर्षीचे रडगाणे बनले आहे. त्यामुळे रेल्वेमार्गावर किती पाऊस पडतो याचा अंदाज घेण्यासाठी पश्चिम रेल्वे आणि भारतीय हवामानशास्त्र विभाग पश्चिम रेल्वेवर पहिले स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र भायंदर रेल्वे स्थानकावर बसवणार आहे. किती वेळेत किती पाऊस पडला याची नोंद घेऊन रेल्वे प्रशासनाला त्याप्रमाणे नियोजन करणे शक्य होणार आहे.

पश्चिम रेल्वे आणि भारतीय हवामानशास्त्र विभाग यांच्या प्रयत्नांनी पश्चिम रेल्वेवर पहिले स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र भायंदर स्थानकावर उभारण्यात आले आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते विरार या भागात एकूण सहा ठिकाणी स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात येणार आहे. महालक्ष्मी, वांद्रे, राम मंदिर, दहिसर, मीरा रोड या ठिकाणी स्वयंचलित यंत्रणा बसवून पावसाच्या नोंदी घेण्यात येणार आहे. या पाच स्थानकांवर ३१ मेपर्यंत स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र बसविले जाणार आहे. त्यामुळे किती वेळेत किती पाऊस पडला यांची नोंद घेऊन रेल्वे नियोजन करणे शक्य होणार आहे. तसेच अचूक वेळेत किती पाऊस पडला याची माहिती यातून मिळणार आहे. यामध्ये कोणत्याही मानवी हस्ताक्षेपाशिवाय ही यंत्रणा काम करणार असल्याने रेल्वेला मुसळधार पावसाच्या आधीच नियोजन करणे सोपे जाणार आहे. ही यंत्रणा सौरऊर्जेवर चालविण्यात येत असून आवश्यकतेनुसार विद्युत पुरवठा केला जाणार आहे. यासह बॅटरी बॅकअ‍ॅपची यंत्रणा बसवण्यात आली आहे.

- Advertisement -

लोकल सेवांच्या नियोजनास होणार मदत
पश्चिम, मध्य रेल्वेवर अनेक भाग सखल असून तिथे मोठ्या प्रमाणात पाणी साचून लोकल वाहतूक विस्कळीत होते. अशावेळी या भागात पडणार्‍या पावसाचा सरासरी अंदाज मिळाल्यास लोकल सेवांच्या नियोजनास सहाय्य मिळू शकते. हे लक्षात घेत पश्चिम रेल्वेने यावर्षी थेट हवामान खात्याची मदत घेतली आहे. त्यासाठी वेगवेगळ्या रेल्वेमार्गांवर पावसाच्या पाण्याचा आढावा घेण्यासाठी स्वयंचलित पर्जन्यमापक उपकरणे बसवण्यात आले आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर मान्सूनची तयारी जोरदार सुरू आहे. मान्सूनपूर्व कामाचा पहिला टप्पा २५ मे पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. तर दुसरा टप्पा १ जून ते ३० सप्टेंबर असणार असून यात पावसाळ्यातील महत्त्वाची उपाययोजना केली जाणार आहे. त्यामुळे या स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्राचा वापर पश्चिम रेल्वेसाठी खूप उपयोगी पडणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -