घरमुंबईप्लास्टीक, गुलाल, डिजेचा वापर टाळा !

प्लास्टीक, गुलाल, डिजेचा वापर टाळा !

Subscribe

ठाणे महापालिकेचे गणेश भक्तांना पथनाटयातून आवाहन

ठाणे : यंदाच्या गणेशोत्सवात प्लास्टिक बंदी आणि पर्यावरणस्नेही सणांच्या जनजागृतीसाठी ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण कक्षातर्फे शहरात विविध ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. प्लास्टीकचा वापर करू नये, कचरा कुंडीचा वापर करावा, निर्माल्य कंपोस्ट खतात टाकावे, मिरवणुकीत गुलालाचा वापर टाळावा, डॉल्बी, डिजे, लाऊड स्पीकरचा वापर करू नये आदी आवाहन या पथनाटयातून करण्यात आले.

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रात ’पर्यावरणस्नेही उत्सव संकल्प’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत पथनाट्याच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे फायदे व नुकसान याबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली. यापूर्वीच प्लास्टिकचा वापर करणार्‍या नागरिकांवर तसेच दुकानदार, व्यावसायिकांवर महापालिकेने कारवाई सुरु केली आहे. मात्र सण-उत्सव काळात प्लास्टिकचा वापर वाढ़ू नये यासाठी ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध गणेशोत्सव मंडळांच्या आवारात तसेच शहरातील मुख्य चौकात पथनाट्याच्या माध्यमातून महापालिका ठाणेकर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

- Advertisement -

निमकर आर्ट्स या संस्थेमार्फत पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. त्यानुसार गणेशभक्तांना प्लास्टिक पिशव्यांचे दुष्परिणाम विविध फलक, घोषवाक्यांद्वारे समजवण्यात आले. मूर्ती विसर्जित करण्यासाठी महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम तलावांचा वापर करणे, ओला कचरा-सुका कचरा वेगळा करून कचरा टाकण्यासाठी महापालिकेच्या सार्वजनिक ठिकाणी उभारलेल्या कचरा कुंडीचा वापर करणे, मिरवणुकीत गुलालाचा वापर टाळणे, ध्वनिक्षेपकाचा आवश्यक तेवढा व कमी वापर करणे. यातही डॉल्बी, डिजे, लाऊड स्पीकरचा वापर करू नये, निर्माल्याचे नदीत विसर्जन न करता त्याचे कंपोस्ट खतात रूपांतर करणे आदी संकल्पना राबविणे, इत्यादी बाबींसाठी लोकांना पथनाट्याच्या माध्यामातून आवाहन करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -