गद्दारांसोबत का गेले? आजोबांच्या प्रश्नाला आ. बच्चू कडूंनी दिले ‘हे’ उत्तर

आजोबांनी बच्चू कडूंना तुम्ही डाकूसोबत का गेले? असा सवाल केला होता. याचंही उत्तर बच्चू कडूंनी दिलंय. यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले....

Bachchu-Kadu
एवढ्या लवकर कारवाई करण्याची गरज नव्हती बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

“तुम्ही गद्दार आहात, असे का वागला. एका डाकूबरोबर तुम्ही गेलात. जरा नीट वागा, राज्यघटनेच्या चौकटीत वागा”, असं म्हणत आज एका आजोबांनी बच्चू कडूंना चांगलंच खडसावलंय. “यांचं असं वागणं योग्य नाही. यांनी जनतेबरोबर गद्दारी केली आहे. बच्चू कडूंना ज्या धोरणाने निवडून दिले. ज्या आशेनं निवडून दिले, तसे ते वागत नाहीत. हे सर्व घटनाबाह्य आहे.” असं हे आजोबा म्हणाले. याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. यावर आता बच्चू कडूंनी समोर येऊन यावर आपली प्रतिक्रिया दिलीय.

आमदार बच्चू कडू हे काल धाराशिव येथे कोर्टाच्या कामानिमित्त आले होते. कोर्टाचं काम आटोपून बच्चू कडू बाहेर निघत होते. ते कार्यकर्त्यांशी, जनतेशी संवाद साधत असताना अचानक एक ८० वर्षीय आजोबा आले आणि बच्चू कडूंना खडेबोल सुनावू लागले. “महाराष्ट्राला जनतेला काय त्रास द्यायलेत? गद्दारी केली. हा गद्दारीचा बाप आहे..अशा शब्दात ते जाब विचारत होते. यावेळी बच्चू कडूंनी आजोबांना टाळण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी या आजोबाला बाजूला केलं आणि बच्चू कडू यांचा ताफा पुढे रवाना झाला.

या ड्रामानंतर आता बच्चू कडूंनी पुढे येत यावर आपली प्रतिक्रिया दिली. एका वृत्तवाहिनीशी संवाध साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. “धाराशिवमध्ये प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्याला कुणीतरी पाठवून दिलं, असा संशय बच्चू कडू यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘ ते आमच्या वडिलांसारखे आहेत. मी त्यांच्यासोबत २-३ मिनिटं चर्चा केली. परंतू त्यांची मानसिकता चर्चा करायची नव्हती. त्या काकांची. ते कुणीतरी पाठवून दिलेल्यापैकी असावेत, असं चित्र होतं. पण एकंदरीत त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही उद्धव शाहेबांना सोडून का गेले… असं ते म्हणत होते, यावरून बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दिलं.

आजोबांनी बच्चू कडूंना तुम्ही डाकूसोबत का गेले? असा सवाल केला होता. याचंही उत्तर बच्चू कडूंनी दिलंय. यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, “मी शिवसेनेत असताना आमच्यावर जेव्हा अन्याय झाला. त्यावेळी इथले पालकमंत्री भाजपाचे होते. आम्ही शिवसेनेचे होते. आमच्यावर केसेस झाल्या. तेव्हा शिवसेनेकडून न्याय मिळाला नाही. शौचालय भ्रष्टाचार प्रकरण झालं. त्यात जेव्हा वरिष्ठांकडून न्याय भेटत नाही, हे पाहून आम्ही शिवसेना सोडली. प्रहार पक्ष स्थापन केला. २५ वर्षांपासून काम करतोय. आमचे स्वतःचे २ आमदार निवडून आले. हे शिवसेनेच्या ताकतीवर आले नाहीत. शिवसेनेच्या भरोशावर आणले नाहीत. शिवसेना सोडून एवढी वर्ष झाल्यानंतर स्वतःच्या मेहनतीवर, साडेतीनशे गुन्हे दाखल झाल्यानंतर १०० वेळा रक्तदान केलंय… कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत करून दोन आमदार निवडून आले आहेत”, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.

यावेळी बच्चू कडूंनी सगळा घटनाक्रमही सांगितला. “आम्ही देवेंद्र फडणवीसांकडे गेलो. त्यांनी पाठिंबा मागितला होता. पण त्यांच्या शर्थी-अटी होत्या. आम्ही मान्य केल्या नाहीत. मग उद्धव साहेबांकडे गेलो. त्यावेळी ते भाजप-शिवसेना युतीकडून लढले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन आपण मुख्यमंत्री होऊ शकतो, असं त्यांना वाटलं. त्यांनी आम्हाला बोलावलं. शिंदेसाहेब सोबत होते. त्यांनी आग्रह केला. तुम्ही आम्हाला पाठिंबा दिला तर बळ भेटेल, म्हणाले. शिवसैनिकाचं जुनं नातं म्हणून आम्ही उद्धव साहेबांना पाठिंबा दिला. त्यांनी कॅबिनेट मंत्र्याचा शब्द दिला होता. राज्यमंत्री केलं. त्याबद्दल वाइट वाटत नाही” असं देखील बच्चू कडू म्हणाले.