घरमुंबईनवे मुख्यमंत्री राजकारणातील हरिश्चंद्र माणूस - बच्चू कडू

नवे मुख्यमंत्री राजकारणातील हरिश्चंद्र माणूस – बच्चू कडू

Subscribe

पण आमदार बच्चू कडू यांनी मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजकारणातील हरिश्चंद्र आहेत, अशी स्तुती त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची केली.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी हातात घेतल्यानंतर आज त्यांचा अधिवेशनाचा पहिलाच दिवस होता. आज महाविकास आघाडीने दोन दिवसाच्या विशेष अधिवेशनात बहुमत सिद्ध केले. पण यावेळी भाजपच्या आमदारांनी सभात्याग केला. पण आमदार बच्चू कडू यांनी मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजकारणातील हरिश्चंद्र आहेत, अशी स्तुती त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची केली.

काय म्हणाले बच्चू कडू?

दोन दिवस बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीने बहुमत सिद्ध केलं. यावेळी भाजपच्या आमदारांनी सभात्याग केला. दरम्यान बहुमत सिद्ध झाल्यानंतर सर्व आमदारांनी मत व्यक्त केलं. यावेळी मत व्यक्त करताना आमदार बच्चू कडू म्हणाले की, “उद्धव ठाकरे हे राजकारणातील हरिश्चंद्र आहेत असे मी मानतो. उद्धव ठाकरे शब्दाला जागणारे असून बाळासाहेबांकडून त्यांना राजकारणातील बाळकडू मिळालं आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो”.

- Advertisement -

तर भाजपला राग का यावा? जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांनी भाजपच्या भूमिकेवर टिका केली आहे. फुले, आंबेडकर, शाहूंबद्दल भाजपाला असूया वाटत असल्याची टिका त्यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाचा शपथवीधीदरम्यान जर उल्लेख झाला तर भाजपाला राग का यावा. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल भाजपाला असूया आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -