घरमुंबईवाडिया हॉस्पिटलमध्ये २० नवे व्हेंटिलेटर्स, रुग्णांना होणार फायदा

वाडिया हॉस्पिटलमध्ये २० नवे व्हेंटिलेटर्स, रुग्णांना होणार फायदा

Subscribe

रिद्धी आणि सिद्धी या सयामी जुळ्यांच्या ५ व्या वाढदिवसाच्या औचित्याने बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटलतर्फे आज रुग्णालयाच्या एनआयसीयूमध्ये २० व्हेंटिलेटर्सची भर घातली. या सुविधेमुळे बीजेडब्ल्यूएचसी हे ७० व्हेंटिलेटर्स असलेले आशियातील सर्वात मोठे बालरुग्णालय ठरले आहे.

दरवर्षी भारतात सुमारे ८ लाख नवजात बालकांचा मृत्यू होतो. साधारण ३५ लाख बालके ही अपरिपक्व अवस्थेत जन्मतात असा आकडेवारीनुसार सांगण्यात आले असून साधारण ३ लाख नवजात बालकांचा या दरम्यान मृत्यू होतो. व्हेंटिलेटचर्सच्या कमतरतेमुळे दुसऱ्या ठिकाणी व्हेंटिलेटर्सचा शोध घ्यावा लागतो. त्यादरम्यान सुमारे ३५०० अपरिपक्व नवजात बालकांचा मृत्यू होतो.

- Advertisement -

लहान मुलांना असलेल्या दीर्घकालीन आजारामुळे त्यांना व्हेंटिलेशनची गरज भासते आणि अशा प्रकारची आरोग्यसेवेमधील तफावत आणि उपलब्धतेमधील अडथळे या समस्यांवर तोडगा काढण्याचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी नेस वाडिया यांनी सांगितले. सर्व रुग्णालयांमध्ये मिळून सुमारे १००० अतिदक्षता कॉट्स असून केवळ ४५७ कॉट्ससाठी व्हेंटिलेटर्सची सुविधा असल्याचे वाडिया हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले. ही संख्या वाढल्यामुळे अनेक जीव वाचण्यासाठी प्रयत्न करता येतील असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -