घरमुंबईअंजली दमानिया यांचे व्हायरल झालेले माफीचे 'ते' ट्वीट फेक!

अंजली दमानिया यांचे व्हायरल झालेले माफीचे ‘ते’ ट्वीट फेक!

Subscribe

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मराठा सामाजाबाबत केलेल्या ट्विटमुळे मराठा सामाजामध्ये नाराजीचे स्वर उमटले होते. या ट्वीट विरोधात अनेकांनी त्यावर कमेंट केल्या. केलेल्या ट्वीटबद्दल मराठा समाजाची माफी मागावी अशी मागणी कमेंटद्वारे करण्यात आली. मात्र दमानिया यांनी माफी न मागता त्याच्यावर स्पष्टीकरण दिले. मात्र दमानिया यांचे फेक ट्विटर अकांऊट तयार करुन त्यामधून मराठा समाजाची माफी मागण्यात आली. सध्या हा फेक अंकाऊट सर्व सोशल मिडीयावर वायरल झाले आहे. दमानिया यांनी नमते घेऊन अखेर मराठा सामाजाची माफी मागीतली अशी अफवा पसरवली जात आहे.

 

- Advertisement -

‘लोक आपल्या जाती बद्दल गाडीवर लिहून आपल्याच जातीचे गुणगाण गातात. यामागे राजकीय पक्षातील लोकांचे हात आहे जे नेहमी जातीवादाचे बीज त्यांच्या डोक्यात पेरतात. आपण भारतीय म्हणून का वागत नाही? मी कोणतीही जात किंवा धर्म मानत नाही’ असे ट्वीट अंजली दमानिया यांनी केले होते. या ट्वीटपुढे त्यांनी ‘मराठा’ लिहिलेल्या गाडीचे चित्र अपलोड केले. यामुळे वादाला तोंड फुटले आणि मराठा समाजाकडून याचा विरोध करण्यात आला.

- Advertisement -
anjali damania fake tweet
फेक अकाऊंटवरुन अंजली दमानिया यांच्या माफीचे ट्वीट

मात्र, आज सकाळी एका फेक अकाऊंट वरुन “मी काल केलेल्या पोस्टने मराठा समाजाच्या भावना दुखावल्या, त्यामुळे मी आज सकल मराठा समाजाची जाहीर माफी मागते.” असा मजकूर प्रसिद्ध करण्यात आला. त्यामुळे दमानिया यांनी ट्वीट बाबत माफी मागितली असल्याचे सोशल मीडियावर वायरल झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -