घरमुंबईBakra Eid-2023 : वाहन पार्किंग शुल्क माफ करा; आमदार रईस शेख

Bakra Eid-2023 : वाहन पार्किंग शुल्क माफ करा; आमदार रईस शेख

Subscribe

 

मुंबई: मुस्लिम धर्मियांच्या बकरी ईद सणासाठी देवनार कत्तलखान्यात अधिकाधिक सेवासुविधा द्याव्यात. ईद निमित्ताने देवनार कत्तल खान्यात बाहेरून आणण्यात येणारे बकरे, म्हैसवर्गीय जनावरे यांच्या खरेदी – विक्रीसाठी, देखभालीसाठी अधिकाधिक सेवासुविधा देण्यात याव्यात. तसेच, कत्तलखाना व परिसरात दाखल होणाऱ्या वाहनांना पार्किंग शुल्क माफ करावे, आदी मागण्या समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी महापालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे केल्या आहेत.

- Advertisement -

येत्या २८ जून रोजी (संभवत:) बकरी ईद सण साजरा केला जाण्याची शक्यता आहे. या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर देवनार कत्तलखान्यातील पूर्वतयारीबाबत मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी बुधवारी बैठक आयोजित करून सखोल आढावा घेतला.

याप्रसंगी आमदार रईस शेख, अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा, सह आयुक्त (पालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, उप आयुक्त (परिमंडळ-५) हर्षद काळे, देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक कलीमपाशा पठाण, माजी नगरसेवक, महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

बकरी ईद सणाच्या निमित्ताने कत्तलखान्यामध्ये उपलब्ध करून द्यावयाच्या सोईसुविधा आणि आवश्यक कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त चहल यांनी या वेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे देवनार कत्तलखान्यात उपलब्ध करण्यात येणाऱ्या विविध सोईसुविधा व कामांच्या तयारीबाबत सविस्तर माहिती देवनार कत्तलखान्याचे महाव्यवस्थापक कलीमपाशा पठाण यांनी सदर आढावा बैठकीत दिली.

बकऱ्यांच्या चोरीला आळा घालण्याची मागणी

देवनार कत्तलखान्यातील ग्रेझीम यार्ड परिसरात पर्जन्य जलवाहिन्या टाकणे, अंतर्गत परिसरामध्ये सिमेंट काँक्रिटचे रस्ते बनविणे, घनकचरा व्यवस्थापन, साफसफाई करण्यासाठी संस्थांची नेमणूक, बकऱ्यांच्या चोरीला आळा घालण्यासाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली तयार करणे, म्हैसवर्गीय प्राण्यांच्या धार्मिक पशुवधासाठी व्यवस्था करणे, वाहनांचे पार्किंग प्रवेश शुल्क माफ करणे, पावसाच्या पार्श्वभूमीवर योग्य व्यवस्था करणे आदी मागण्या आ. रईस यांनी बैठकीत केल्या.
या सर्व मागण्यांनुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी या वेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -