घरमुंबईबाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांच्यात शाब्दिक चकमक

बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांच्यात शाब्दिक चकमक

Subscribe

मनसेतील गटबाजी चव्हाट्यावर

मनसेचे नगरसेवक संजय तुर्डे हे मुबंई महापालिकेत एल कुर्ला वार्डात अनेक समस्यांच्या तक्रारी घेऊन जातात. पण महापालिकेचे अधिकारी यासंदर्भात कोणतीच कारवाई करत नाहीत. यासंदर्भात मनसेतर्फे काल महापालिकेच्या एल विभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. याचवेळी मनसेचे नेते आंदोलनात वाद घालताना दिसले. हा वाद मनसेनेते बाळा नांदगावकर आणि सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यात कार्यकर्ते आणि मीडियासमोर झाल्याने आंदोलनातच ठिणगी पडल्याचं दिसतं होतं. या वादामुळे मनसेतील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

पालिका अधिकार्‍यांशी बोलताना संदीप देशपांडे यांनी आवाज चढवत दमदाटी केली. त्यावेळी बाळा नांदगावकर यांनी देशपांडे यांना शांत करत बोलले की, एवढ्या लांबून वेळ काढून आलोय जर तुम्हालाचं बोलायचे असेल तर मी निघतो. बाळा नांदगावकराच्या या वक्तव्याने संतापलेल्या संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी आंदोलन अर्धवट सोडून काढता पाय घेतला.

- Advertisement -

संदीप देशपांडे यांचे न बोलता आंदोलनातून शांतपणे निघून जाण्याने मनसेमधील जेष्ठ नेते आणि दुसर्‍या फळीतील वाद शिगेला गेल्याचं बोल जात आहे. हा वाद नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, रिटा गुप्ता, राजा चौगुले या मनसेच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थित झाल्याने मनसे नगरसेवक संजय तुर्डे यांच्यावरील अन्यायापेक्षा मनसे नेत्यांच्या वादावरच चर्चा मनसे कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंत हा वाद पोचल्याचे सांगितले जात आहे. मात्र हा वाद नसल्याचे मनसे नेते म्हणत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -