घरमुंबईपश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत; वांद्रे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत; वांद्रे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड

Subscribe

वांद्रे स्टेशनदरम्यान तांत्रिक बिघाड झाला असल्याकारणाने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. पश्चिम रेल्वेवरील वाहतूक १० ते १५ मिनिटं उशिराने सुरू आहे.

ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वांद्रे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाला असल्याकारणाने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे पश्चिम रेल्वेवरील वाहतूक १० ते १५ मिनिटं उशिराने सुरू आहे. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या वाहतुकीवर आता परिणाम झाला आहे. तर लोकल देखील एका मागोमाग थांबल्या आहेत.

तांत्रिक बिघाडामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल झाले आहेत. शिवाय, मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली आहे. वांद्रे स्थानका दरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -