घरमुंबईवांद्रे- वर्सोवा सी लिंकचे काम त्वरित थांबवा - हायकोर्ट

वांद्रे- वर्सोवा सी लिंकचे काम त्वरित थांबवा – हायकोर्ट

Subscribe

'पुढील सूचना देईपर्यंत तुर्तास वांद्रे- वर्सोवा सी लिंकचे काम त्वरित थांबवण्यात यावे,' असे आदेश मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्या खंडपीठाने एमएसआरडीसीला दिले आहेत.

वांद्रे – वर्सोवा सीलिंकच्या कामाला मुंबई हायकोर्टाकडून स्थगिती देण्यात आली आहे. १७.१७ किलोमीटर लांबी असलेल्या या सी लिंकच्या कामाला दोन आठवड्यांसाठी ही स्थगिती देण्यात आली आहे. ‘वांद्रे – वर्सोवा सी लिंक’ हा वांद्रे- वरळी सी लिंकचा पुढचा टप्पा आहे. राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि रिलायन्स इन्फ्रास्टक्चर यांच्यामध्ये या नव्या सी लिंकसंदर्भात सप्टेंबर २०१८ मध्ये सामंजस्य करार झाला होता. एकूण  १७.१७ किलोमीटर लांबीचा हा महामार्ग उपनगराक राहणारे मुंबईकर अवघ्या २० मिनिटांमध्ये दक्षिण मुंबई पर्यंत पोहचू शकणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांसाठी आणि मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेसाठी हा सी लिंक नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी या महामार्गाच्या कामाला सुरुवातदेखील झाली होती. मात्र, या प्रकल्पामुळे पर्यावरणाचे खूप मोठे नुकसान होत असल्याचं काही संघटनांनी म्हटलं. याप्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली होती.

‘हा सी लिंक बांधण्यासाठी जुहू कोळीवाड्याजवळील कांदळवनाची एमएसआरडीसीकडून कत्तल करण्यात येणार असून, तेथील तकांदळवनाचे अस्तित्त्वच नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे’, असं याचिकाकर्त्यांनी म्हटलं होतं. तर दुसरीकडे स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध केला असता. त्यांना धमकी देण्यात येत असल्याचे वात्सवही समोर आले आहे.  त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, या सर्व मुद्द्यांबाबत सादर करण्यात आलेल्या याचिकेवर या शुक्रवारी सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान ‘पुढील सूचना देईपर्यंत तुर्तास वांद्रे- वर्सोवा सी लिंकचे काम त्वरित थांबवण्यात यावे,’ असे आदेश मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्या खंडपीठाने एमएसआरडीसीला दिले आहेत.

वांद्रे- वर्सोवा सी लिंक विषयी थोडक्यात…

  • हा एकूण १७.१७ किलोमीटर लांबीचा महामार्ग असणार आहे
  • या संपूर्ण मार्गातील मुख्य रस्त्यासह वांद्रे जोडरस्ता, कार्टर रोड, जुहू कोळीवाडा जोडरस्ता, नाना नानी पार्क जोडरस्ता येथे टोल नाके उभारले जाणार आहेत
  • उड्डाणपुलांच्या माध्यमातून हा रस्ता थेट पश्चिम द्रुतगती महामार्गाला  जोडण्यात येणार आहे
  • वर्सोवा,अंधेरी तसंच बोरीवली या भागांतील लोकांना या मार्गामुळे दक्षिण मुंबईत येण्यासाठी अवघ्या २० मिनीटांचा कालावधी लागणार आहे

वाचा : शक्ती मिल बलात्कार प्रकरणी सरकार ‘असंवेदनशील’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -