घरताज्या घडामोडीकपडे धुताय ? सावधान ! वसईत झाला वॉशिंग मशीनचा स्फोट

कपडे धुताय ? सावधान ! वसईत झाला वॉशिंग मशीनचा स्फोट

Subscribe

आजकाल प्रत्येक घरात कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन असतेच. अनेकांना वॉशिंग मशीन सुरू करुन बाहेर जाण्याची सवय असते मात्र ही सवय तुमच्या अंगलट येऊन अशा प्रकारे दुर्घटना घडू शकतात. त्यामुळे तुम्ही देखील वॉशिंग मशीन वापरत असाल तर सावधानीपूर्वक वापरा.

Washing Machine Explosion : आपल्या आयुष्यात रोजच्या कामांची जागा आता यंत्रांनी घेतली आहे. आजकाल कपडे धुण्यासाठी हमखास वॉशिंगचा वापर केला जातो. यंत्रे आपली कामे हलकी करतात मात्र यंत्रे वापरणे एखाद दिवशी आपल्या जिवावर देखील बेतू शकते. असाच एक प्रकार घडलाय वसईमध्ये. वसईच्या ओम नगर परिसरात धुरी इमारतीत कपडे धुत असताना राहत्या घरी वॉशिंग मशीनचा अचानक स्फोट झाला. कपडे धुत असताना शॉर्ट सर्कीट झाल्याने हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सोमवारी ही घटना घडल्यानंतर इमारतीत इतर घरांमध्ये भितीचे वातावरण पहायला मिळत आहे.

वसईमध्ये वॉशिंग मशीनचा स्फोट झाल्यानंतर वॉशिंग मशीनने पेट घेतला. आग बऱ्यापैकी पसरण्याची शक्यता होती. बाथरुममध्ये वॉशिंग मशीन असल्याने बाथरुममधील अनेक वस्तू जळण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे तात्काळ अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. अग्निशामन दलाचे जवान आणि माणिकपूर पोलीस वेळेत घटनास्थळी दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आणि मोठी दुर्घटना टळली.

- Advertisement -

आजकाल प्रत्येक घरात कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन असतेच. अनेकांना वॉशिंग मशीन सुरू करुन बाहेर जाण्याची सवय असते मात्र ही सवय तुमच्या अंगलट येऊन अशा प्रकारे दुर्घटना घडू शकतात. त्यामुळे तुम्ही देखील वॉशिंग मशीन वापरत असाल तर सावधानीपूर्वक वापरा.

वॉशिंग मशीन वापरताना काय काळजी घ्यावी ?

  • वॉशिंग मशीन घरात सुरक्षित ठिकाणी ठेवा.
  • मशीनची वायर उंदीर कुडतडणार नाही किंवा वायरवर कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी ठेवा.
  • वॉशिंग मशीनची वेळच्या वेळी सव्हिसिंग करुन घ्या.
  • वायर तुटलेली असेल तर शॉर्ट सक्रिटचा धोका असतो त्यामुळे वायर चेक करा.
  • वॉशिंग मशीनवर पाणी मारू नका.
  • नादुरुस्त मशीनचा वापर शक्यतो टाळा.

हेही वाचा –  Mumbai-Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर ६ गाड्यांचा भीषण अपघात, चार जणांचा…

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -