घरताज्या घडामोडीमुंबईत गोवरच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये १०० खाटांची सुविधा

मुंबईत गोवरच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये १०० खाटांची सुविधा

Subscribe

मुंबईत मागील काही दिवसांपासून गोवरच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशानस आणि आरोग्य यंत्रणा आजाराला प्रतिबंध करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत.

मुंबईत मागील काही दिवसांपासून गोवरच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशानस आणि आरोग्य यंत्रणा आजाराला प्रतिबंध करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. अशातच गोवर रुग्णांच्या उपचारासाठी मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये १०० खाटांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. (bed facility in seven hills hospital for measles patients)

मुंबईत गोवरची साथ मोठ्याप्रमाणात पसरल्यानंतर गोवरला प्रतिबंद करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. घरोघरी भेटी देत बालकांची पाहणी करत असून, ज्या बालकांची प्रकृती चिताजनक असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार केले जात आहेत. या उपचारांसाठी त्यांना कस्तुरबासह राजावाडी, गोवंडी शताब्दी, गोवंडी प्रसुतीगृह, कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात काही कक्ष निर्माण करण्यात आले आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या एम पूर्व विभागांत सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आतापर्यंत ३३७८ संशयित रुग्ण असून त्यातील आतापर्यंत २२० निश्चित रुग्ण आढळून आले. त्यामुळे आता ३२ लाख ३३ हजार ०६८ घरांची तपासणी केली असून मंगळवारी २ लाख ९७ हजार ०७४ तपासणी करण्यात आली होती. यामध्ये मंगळवारी ताप आणि अंगावर पुरळ उठलेले १७० बालके आढळून आली.

गोवरच्या वाढत्या साथीच्या आजारामुळे प्रारंभी कस्तुरबा रुग्णालयांमध्ये या आजाराच्या उपचारासाठी कक्ष निर्माण करण्यात आला होता. त्यानंतर वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता गोवंडी शताब्दी अर्थात पंडित मदन मोहन रुग्णालय आणि गोवंडी प्रसुतीगृहांमध्ये बाल रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी कक्ष निर्माण करण्यात आले. राजावाडी रुग्णालय, कांदिवली शताब्दी अर्थात डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयामध्ये व्यवस्था करण्यात आली होती.

- Advertisement -

त्यानंतर आता कोविड स्पेशालिटी रुग्णालय म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये खाटांची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या बालकांची प्रकृती चिंताजनक असेल त्यांना रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यासाठी सेव्हन हिल्स रुग्णालयात काही खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, गोवरच्या आजार रोखण्यासाठी ९ महिने ते पाच वर्षांमधील बालकांना गोवरची लस त्वरीत देण्याचे आवाहन महापालिका आरोग्य विभागाने केले आहे.

महापालिकेच्या यासर्व रुग्णालयांमध्ये ३१६ खाटा यासाठी राखीव असून त्यातील ११४ खाटांवर रुग्ण दाखल आहेत तर २०२ खाटा या रिकाम्या आहेत. सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये १०० खाटा या ऑक्सीजच्या राखीव आहेत. त्यामध्ये १० खाटा या अतिदक्षता विभागाच्या (ICU) तर १० खाटा या व्हेंटीलेटरच्या आहेत.


हेही वाचा – ‘मविआ’च्या मदतीने क्लीन अप चांगले केले, म्हणूनच सीबीआयला काही मिळाले नाही; नितेश राणेंचा आरोप

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -