घरमुंबईमाटुंगा किंग्ज सर्कलच्या रस्त्यावर 'द बर्निंग बस'चा थरार

माटुंगा किंग्ज सर्कलच्या रस्त्यावर ‘द बर्निंग बस’चा थरार

Subscribe

माटुंग्याच्या महेश्वरी उद्यान येथे दुपारी ४.३० वाजता बेस्टच्या बसला अचानक आग लागली. परिणामी काही काळ त्या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली.

पावसाळ्याच्या दिवसांत मुंबईतील माटुंगा मधील महेश्वरी उद्यान येथे आज बेस्टच्या एका बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. बेस्ट चालक आणि वाहकाने प्रसंगावधान दाखवत बसमधील ३ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. त्यामुळे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण बेस्टची बस मात्र जळून खाक झाली.

महेश्वरी उद्यानात ‘द बर्निंग बस’चा थरार

मुलुंड वैशाली नगर ते वरळी मार्गावर धावणारी बस क्रमांक २७ ने अचानक पेट घातला. माटुंगा-किंग्जसर्कल दरम्यान महेश्वरी उद्यानाजवळ मुलुंडहून वरळीकडे जात असलेल्या या बसच्या केबिनमधील इलेक्ट्रिक बोर्डातून धूर येऊ लागला. त्यानंतर बसमधून आगीच्या ज्वाळा भडकू लागल्या. लगेचच बसचालकाने प्रसंगावधान राखत बस पुलावरून खाली घेऊन रस्त्याच्याकडेला उभी केली. यावेळी बसमधून तीन प्रवासी प्रवास करत होते. बस चालक आणि वाहकाने त्या प्रवाशांना खाली उतरवले. यावेळी बसचालकाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण वाऱ्यामुळे आग आणखीनच भडकली. त्यामुळे आगीने बसच्या संपूर्ण केबिनचा ताबा घेतला.

- Advertisement -

मुलुंड येथे बेस्ट बसला भीषण आग

बेस्ट बसला आग | ATM च्या गार्डने विझवली आग

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಜುಲೈ 31, 2019

सुदैवाने जीवित हानी नाही

वरळी बस आगाराची ही २७ क्रमांकाची बस होती. मुलुंड वैशाली नगर ते वरळी मार्गावर ही बस धावते. आज दुपारी ४.३० वाजता मुलुंडहून वरळीकडे जात असताना माटुंगा-किंग्जसर्कल दरम्यानच्या महेश्वरी उद्यानाजवळ ही बस आली असता अचानक बसचालकाच्या केबिनमधील इलेक्ट्रिक बोर्डातून धूर येऊ लागला आणि आगीच्या ज्वाळा भडकू लागल्या. त्यामुळे चालकाने ही बस पुलावरून खाली घेऊन रस्त्याच्याकडेला उभी केली. बसमधून अचानक धूर येऊ लागल्याने या बसमधून प्रवास करणाऱ्या तिन्ही प्रवाशांना तात्काळ खाली उतरविण्यात आले. या घटनेमुळे या रस्तावरील वाहतूकही काही काळ थांबवण्यात आली होती. ही घटना पाहण्यासाठी बघ्यांची खूप गर्दी जमली होती. काही वेळाने अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. १५ मिनीटांत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही अशी माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -