घरमुंबईसंपामुळे बुडलेले 'बेस्ट पास'चे दिवस भरुन मिळणार

संपामुळे बुडलेले ‘बेस्ट पास’चे दिवस भरुन मिळणार

Subscribe

बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे या कालावधीत प्रवाशांना बससेवेचा लाभ घेता आलेला नाही. परिणामी, बसधारक प्रवाशांचे झालेले आर्थिक नुकसान विचारात घेऊन बेस्ट प्रशासनाने बसपासचा वैधता कालावधी वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी ८ जानेवारी ते १६ जानेवारी या कालावधी दरम्यान नऊ दिवसांचा बेमुदत संप पुकारला होता. बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे या कालावधीत प्रवाशांना बससेवेचा लाभ घेता आलेला नाही. परिणामी, बसधारक प्रवाशांचे झालेले आर्थिक नुकसान विचारात घेऊन बेस्ट प्रशासनाने बसपासचा वैधता कालावधी ९ दिवसांनी अथवा बसपासच्या वैधता कालावधीतील उपभोगता न आलेल्या शिल्लक दिवसांच्या कालावधीकरीता विस्तारीत करण्याचे ठरविले आहे.

बसपासमध्ये ९ दिवसांचा कालावधी वाढवणार

एखादा प्रवासी पुढील नूतनीकरणाचा पास काढेल त्यादरम्यान प्रवाशाला त्या पासामध्ये नऊ दिवसांची वैधता वाढून मिळणार असून बसधारक प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, ही सुविधा उपक्रमाच्या बसपास वितरण केंद्रांवर उपलब्ध करण्यात आलेली आहे.

- Advertisement -

असा केला होता बेमुदत संप

बेस्ट कर्मचाऱ्यांनी ८ ते ९ जानेवारी पर्यंत बेमुदत संप पुकारला होता. या संपामुळे मुंबईकरांचे पुरते हाल झाले होते. या नऊ दिवसात मुंबईतील सर्व डेपोंमधून एकही बस बाहेर पडली नव्हती. त्यामुळे मुंबईकरांना या नऊ दिवसात मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागत होतं. मागण्या मान्य होत नाहीत तोवर संपावर ठाम राहणार असल्याची भूमिका बेस्ट कर्मचारी संघटनांनी घेतली होती. मात्र या संपामुळे मुंबईकरांचे आणि बेस्टचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. तसेच या संपामुळे मोठ्या प्रमाणात फायदा घेतला होता तो रिक्षा, टॅक्सी चालकांनी. रिक्षा चालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जात होते. तसेच रिक्षा, टॅक्सी चालकांकडून लूट होत असल्याने मुंबईकरांना पायपीट करावी लागत होती. यामुळे मुंबईकरांना वेठीस धरले जात होते.


वाचा – बेस्ट संप संपला, मराठी माणूस जिवंत राहिला!

- Advertisement -

वाचा – बेस्ट संपात होरपळले हजारो रुग्ण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -