घरमनोरंजनक्रिती-कार्तिकची 'लुकाछुपी' व्हायरल, पाहा धमाल Trailer

क्रिती-कार्तिकची ‘लुकाछुपी’ व्हायरल, पाहा धमाल Trailer

Subscribe

 १ मार्च २०१९ ला कार्तिक आर्यन आणि क्रिती सेननचा 'लुकाछुपी' चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री क्रिती सेनन यांची ‘लुकाछुपी’ आता सर्वांसमोर आली आहे. क्रिती आणि कार्तिकची मुख्य भूमिका असलेल्या ‘लुकाछुपी’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. सोशल मीडियावर सध्या ‘लुकाछुपी’चा Trailer तुफान व्हायरल होतो आहे. ट्रेलर पाहतेवेळी क्रिती सेनन आणि कार्तिक आर्यनची भन्नाट केमिस्ट्री आपल्याला दिसून येत आहे. ‘लुकाछुपी’च्या निमित्ताने क्रिती आणि आर्यन खरंतर पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. मात्र, ट्रेलर पाहताना त्यांच्यातील ही केमिस्ट्री पाहून असं अजिबात वाटत नाही. ट्रेलर पाहतेवेळी ‘लुकाछुपी’ हा एक कॉमेडीपट असल्याचं आपल्याला लगेच कळतं. या चित्रपटात कॉमेडी, अॅक्शन आणि रोमान्सचं जबरदस्त मिश्रण पाहायला मिळणार असल्याचं, चित्रपटाच्या निर्मात्यांचं म्हणणं आहे. काही दिवसांपूर्वीच ‘लुकाछुपी’चे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. पोस्टरवरुन चित्रपटाच्या ट्रेलरविषयीची उत्सुकता अधिकच वाढली होती.

‘लुकाछुपी’चा ट्रेलर पाहताना लग्नासाठी उतावीळ असलेला, गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेली हिरो (कार्तिक) आपल्याला दिसतो. तो लग्नासाठी क्रितीला मागणीही घालतो. मात्र, काहीशी नव्या विचारांची असलेली क्रिती त्याला लग्नासाठी नकार देते आणि लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्याचा पर्याय देतो. यानंतर कशाप्रकारे या दोघांची ‘लग्न स्टोरी’ पुढे जाते? त्यामध्ये काय काय ट्वीस्ट येतात? दोघे लग्न करतात की लिव्ह इनचाच पर्याय स्विकारतात? या सगळ्याची धमाल गुंफण चित्रपटामध्ये करण्यात आली आहे.

- Advertisement -

लक्ष्मण उटेकर यांनी ‘लुकाछुपी’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात कार्तिकने एका स्थानिक न्यूज चॅनेलमधील स्टार रिपोर्टरची भूमिका साकारली आहे. एका छोट्याशा गावात ही लव्हस्टोरी बहरते. चित्रपटाच्या ट्रेलरवरून तरी हा चित्रपट प्रेक्षकांना आपलंस करेल असं दिसतंय. तसंच पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणारी कार्तिक आणि क्रितीची जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असं दिसतंय. मात्र, हा चित्रपट प्रत्यक्षात काय कमाल दाखवतो? हे १ मार्च २०१९ ला चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.


वाचा : कंगनाचा जन्मच ‘मणिकर्णिका’साठी झाला होता…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -